पुणे : कोंढवा येथील भाजी विक्रेते, पथारी व्यावसायिक यांना जागा मिळवून देण्यात इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप चे संस्थापक असलम बागवान यांच्या सत्याग्रहला, प्रयत्नाला यश आले आहे.त्यांच्या समवेत भाजी विक्रेते,पथारी व्यावसायिक ,सामाजिक संघटना सहभागी झाले.शीतल पंपामागील जागा, कुमार पृथ्वी सोसायटी समोरील ओटा मार्केट ची जागा भाजी विक्रेते, पथारी विक्रेते यांना पालिकेकडून उपलब्ध करण्यात आली आहे. या मुद्द्यावरून गेले २६ दिवस संघर्ष,वाद आणि तक्रारी सुरु होत्या.
असलम बागवान यांच्या सत्याग्रही प्रयत्नांना या नीलम अय्यर , महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघचे काशीनाथ नखाते यांनी विशेष सहकार्य केले तसेच मासूम संस्था,जन आंदोलनाची राष्ट्रीय समन्वयक समिती यांनी पाठिंबा दिला तसेच भारतीय काँग्रेस पार्टी,शिवसेना उद्वव गट तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट, जनशक्ती पार्टी लोकसेना पार्टि भारतीय रिपब्लिकन पार्टी च्या कार्यकर्त्यांनी तसेच स्थानिक नागरीकांनी या सत्याग्रहास पाठिंबा दिला.तसेच कोंढवा पोलीस स्टेशन, वानवडी रामटेकडी सह उप आयुक्त, अतिक्रमण विभाग अधिकारी, मालमत्ता विभाग यांचे सहकार्य लागले.
सत्याग्रहचा घटना क्रम
दिनांक 24/6/2025 रोजी माजी नगरसेवकांच्या निकटवर्तीय ने वाहतूक कोंडी याविषयावर सर्व पाक्षीक मिटिंग घेतली वाहतूक समस्या वर बरेच मुद्दे आले जड वाहन अनधिकृत बांधकामा साठी वाळू विट सिमेंट स्टील च्या गाड्या मिक्सर,पाणी टन्कर बेशिस्त वाहतूक तसेच प्रस्तावित डिपी रोड आदी यावर चर्चा करून यावर मार्ग काढण्याचे ठरले या साठी एक कोंढवा वाहतूक समस्या क्रृती समिती स्थापन करण्यात आली यावेळी सर्व सभासद समसमान एक समन्वय व व्हटस अप ग्रृप अडमिन बनविन्याचे ठरले कोंढवा नागरीक विविध मुद्यांनी आधिच त्रस्त होते त्यातच माजी नगरसेवक अजित पवार गटाचे यांनी डिपी रोड करीता चक्रिय उपोषण केले ते फसले.मग याच गटातील माजी नगरसेवक यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचानक समन्वयक यास अध्यक्ष करून त्यास पुढे करून रविवारी 28/6/2025 रोजी सर्व कायदे कोर्टाचे आदेश धाब्यावर बसवून आठवडा बाजार वर कारवाई करीता दडपण आणून कारवाई करण्यात आली.
यानंतर खरे संघर्ष सूरू झाले याच माजी नगरसेवक यांनी तसेच समिती च्या अध्यक्ष म्हणून बसविलेल्या बुजगावण्यास या बाजारात व्यवसाय करणार्यांना धमकावने तर कोणाला आमिश देने तर संविधान अनुच्छेद 14,15,16 चे तसेच 19 ग तसेच 21 उल्लंघन केले गेले.2088 2098,2013 आदी सुप्रीम कोर्टाचे निर्णय यास बगल देत या व्यापारी हातगाडी व्यवसायीक,पथारी व्यावसायिक तथा शेतकरी यांना हुसकावून त्यांचे मुद्देमाल जप्त केले.
या विरूद्ध इनक्रेडीबल समाजसेवक ग्रृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान यांनी पुणे महानगरपालिका यांच्या विरोधात भारतीय संविधान तथा महात्मा गांधी यांनी दिलेल्या सत्य आणी अहिंसा मार्गाने सत्याग्रह सूरू केले निरंतर चालणारे सत्याग्रह त्यातच हातगाडी पथारी शेतकरी लोकांची बेरोजगारी उपासमार होवूनहि एक हि व्यावसायिक याने न डगमगता कायदा आणि सुवेस्थेला तडा जाईल अशी कुठलेच क्रृत नकरता शिव फुले शाहू आंबेडकर मौलाना आझाद तसेच महात्मा गांधी यांच्या मार्गावर चालत सत्याग्रह निरंतर चालूच ठेवले आणी एकानेहि आपले दुकान लावले नाही. यावेळी विरोध म्हणजे माजी नगरसेवक तसेच त्यानी उभा केलेला बुजगावणे तसेच इतर यांनी वेगवेगळ्या पध्दतीने यांनी त्रास देण्याचा तसेच त्याना फोडण्याचा तसे अमिषे दाखवून जेव्हा ते नमले नाही म्हणून सत्याग्रहाची बदनामी तसेच महिला विरूद्ध अपशब्द वापरने आदि कृत्य करून हि शेवटि सत्य प्रत्याडीत होत परंतू पराजित नाही.शेवटी आज यश मिळाले.शितल पेट्रोल पंप मागिल जागा तसेच कुमार पृथ्वी समोरील ओटा मार्केट येथील जागा या व्यापारी यांना उपलब्ध करण्यात आली