सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सिनेमाच्या शूटिंगवेळी ‘किंग’च्या सेटवर शाहरुख खान जखमी, उपचारासाठी अमेरिकेला रवाना; चित्रपटाचे शूटिंग दोन महिने रखडणार
  • चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तीन महिला भाविक बुडाल्या; एकीचा अजूनही शोध सुरू;
  • चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तीन महिला भाविक बुडाल्या; एकीचा अजूनही शोध सुरू
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 जिल्हा

गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन व्यवसाय वाढीसाठी सहकार्य – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

डिजिटल पुणे    19-07-2025 10:53:32

मुंबई :- मत्स्यव्यावसायिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, इतर राज्यांतील यशस्वी प्रयोगांचा अभ्यास, तलावांमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी नवीन पद्धती याकडे लक्ष द्यावे. गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन व्यवसाय वाढीसाठी सहकार्य करण्यात येईल, असे  मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.मंत्रालयात दिंडोरी व पेठ तालुक्यातील गोड्या पाण्यातील मासेमारीच्या समस्या व त्यावर उपाययोजना याबाबत आढावा बैठक झाली.

या बैठकीत मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त किशोर तावडे, उपसचिव किशोर जकाते यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच दिंडोरी व चंदनपुरी येथील मत्स्य व्यावसायिक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले, यावर योजना राबवण्यासोबतच विभागाचा भर मत्स्य व्यवसायिकांचे आर्थिक सामर्थ्य वाढविणे आहे. विभागाच्या माध्यमातून सर्व आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे मंत्री श्री. राणे यांनी सांगितले.शर्व ईंनटरप्राईजेचे समीर पोतनीस यांनी बोटींची धडक टाळण्यासाठी भारतीय बनावटीचे शर्व एआयएस यंत्र बोटीवर बसविण्यासंदर्भात सादरीकरण केले.


 Give Feedback



 जाहिराती