सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सिनेमाच्या शूटिंगवेळी ‘किंग’च्या सेटवर शाहरुख खान जखमी, उपचारासाठी अमेरिकेला रवाना; चित्रपटाचे शूटिंग दोन महिने रखडणार
  • चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तीन महिला भाविक बुडाल्या; एकीचा अजूनही शोध सुरू;
  • चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तीन महिला भाविक बुडाल्या; एकीचा अजूनही शोध सुरू
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 जिल्हा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती शहरातील विविध विकास कामांची पाहणी

डिजिटल पुणे    19-07-2025 16:48:20

 बारामती : शहरात भटकी जनावरे, कुत्र्यांचा वावर तसेच त्याबाबत नागरिकांच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारी गांभीर्याने घेत नगरपरिषदेने बंदोबस्त करावा, त्यासाठी शहरातील विविध भागात कोंडवाड्याकरिता जागा निश्चित करुन प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.बारामती परिसरातील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर, दशक्रिया घाट, शारदा प्रांगण येथील सुरु असलेली विविध विकास कामे, प्रस्तावित माळावरची देवी ते जळोची चौक चारपदरी रस्ता, जळोची कॅनाल पुलावरून संभाजीनगरकडे जाणारा रस्ता, कॅनाल लगतची गार्डन जागा, जळोची ओढ्याशेजारील दशक्रिया घाट, दहनभूमी, दफनभूमी जागा, रुई हद्दीतील विद्या प्रतिष्ठान शेजारील दोन लहान पूल, गार्डन, स्मशानभूमी, पूर संरक्षण भिंतीच्या प्रस्तावित जागेची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांकडून पाहणी केली.

प्रस्तावित जागेवर करण्यात येणाऱ्या कामांची पाहणी करुन श्री. पवार म्हणाले, बारामती परिसरातील हद्दवाढ लक्षात घेता प्रस्तावित जागेवर कामे सुरु करावीत. कामात अडथळा आणणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करावी. या परिसरातील रुई-जळोची ओढा रुंदीकरणाची कामे करताना मोजणी करुन त्यामध्ये अतिक्रमण असल्यास ती काढावीत. या ओढ्याच्या दोन्ही बाजूस पूर संरक्षण भिंतीचे बांधकाम करावे.

शारदा प्रांगण परिसरात उभारण्यात येणाऱ्या सीबीएसई आणि मराठी शाळेत विद्यार्थी व शिक्षकांना लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा विचार करुन इमारत व परिसर विकसित करा. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांकरिता सोयी-सुविधांचा करुन शौचालय, पाणी, विद्युत व्यवस्था आदींच्या अनुषंगाने कामे करावीत.

बाबूजी नाईक वाडा, दशक्रिया घाट परिसरात सावली देणारी झाडे लावावीत. दशक्रिया घाट परिसरामध्ये अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा मिळतील यादृष्टीने नियोजन करुन कामे करावीत. पाणी साचणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. कविवर्य मोरोपंत यांच्या स्मारकाची आवश्यक ती डागडुजी करुन घ्यावी. नदी पात्रातील ड्रेनहोल चेंबर्सला आवश्यक  अंतर सोडून वृक्षारोपण करावे.

बारामती परिसरात विविध विकासकामे सुरु असून आगामी काळात होणारी हद्दवाढीचा विचार करुन पुढची शंभर वर्ष उपयोगात येईल, तसेच कामे करताना ती देखभाल विरहित झाली पाहिजेत, यादृष्टीने नियोजन करून कामे करा, असे निर्देश श्री. पवार यांनी दिले.

स्वच्छतेकरिता नगरपरिषद सेवेत ग्लूटन लिटर पिकिंग मशीन दाखल

आदर पूनावाला स्वच्छ शहर उपक्रमाअंतर्गत स्वच्छतेकरिता ४ ग्लूटन लिटर पिकिंग मशीन देण्यात आल्या आहेत, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या उपस्थितीत नगरपरिषदेच्या सेवेत त्या दाखल करण्यात आल्या.यावेळी उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव विकास ढाकणे, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे  कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी किशोर माने, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, आदर पुनावाला क्लीन सिटी इनिसिएटिवचे मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे, श्री सिद्धेश्वर मंदिरचे विश्वस्त समीर दाते आदी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती