सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने विचित्र अपघात; जीपला जोरदार धडक दिली; दुचाकीचा चेंदामेदा, 8 जखमी
  • बीडमध्ये रेल्वे नव्हे तर विकासाची वाहिनी पोहोचली, गोपीनाथ मुंडेंना ही रेल्वे अर्पण : देवेंद्र फडणवीस
  • मोठी बातमी : मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकला, ठाकरेंची सेना आक्रमक, पोलिसात तक्रार
  • पुणे शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद राहणार, तर शुक्रवारी उशीरा कमी दाबाने पाणीपुरवठा
  • कास पठार, प्रतापगडानंतर साताऱ्यातील आणखी दोन स्थळांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा; महाबळेश्वर,पाचगणी ही युनेस्कोच्या यादीत
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन; 75व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा अन् एकमेकांवर कौतुकाचा वर्षाव
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करा, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
 शहर

वानवडीकरांच्या हक्कासाठी राष्ट्रवादीचा लढा

डिजिटल पुणे    16-09-2025 17:51:00

पुणे : पुणे शहराकडून येताना वानवडीत प्रवेश करण्याचे महत्वाचे ठिकाण म्हणजे सोलापूर महामार्गावरील फातिमा नगर चौक. रोज हजारो वाहने याच चौकातून वानवडीत  प्रवेश करतात, वानवडीच्या अर्थव्यवस्थेला चालना देतात, वानवडीकरांना उत्तम दळणवळणाची सुविधा देतात. 

 

मात्र, पुणे महानगरपालिका व पुणे पोलीस प्रशासनाने काहीही कारण नसताना याठिकाणी उजवीकडे वळण बंद केल्याने पुणे शहरातून येणाऱ्या वाहनांना जवळपास ५०० मीटर पुढे जाऊन पुन्हा यू-टर्न घेऊन ५०० मीटर परत यावे लागते. वानवडीकरानं वर हा फार मोठा अन्याय आहे. याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने फातिमा नगर चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.

 

 

प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे  केवीन मॅन्युअल, प्रफुल्ल  जांभुळकर,  आविनाश   काळे, प्रकाश भंडारी, रवि  परदेशी, रमीज  सय्यद, आशाताई शिंदे, रोहित साळवे, तथा मोठ्या संख्येने सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व असंख्य वानवडीकरांनी या आंदोलनात सहभागी होत प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त केला.


 Give Feedback



 जाहिराती