सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी साहेब, दादा, ताई पुन्हा एक व्हा, नागपुरातील फ्लेक्सनं वेधलं सगळ्यांचं लक्ष
  • अतिवृष्टीचा दणका, बळीराजाला फटका! पिकात छातीएवढं पाणी, सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टक शेती पाण्याखाली
  • बाळासाहेबांच्या बाजूला आनंद दिघेंचा फोटो लावताय, ठाकरे ब्रँडचे महत्व कमी करण्यासाठी राष्ट्रीय कट; संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा
  • मराठा आरक्षण मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर, हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली
  • पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; मध्यरात्री घायवळ टोळीकडून भररस्त्यात फायरींग, एक गंभीर जखमी
 शहर

कोथरुड मतदारसंघाची वाहतूतकोंडीमुक्तीच्या दिशेने वाटचाल ;ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने मिसिंग लिंकचे काम मार्गी

डिजिटल पुणे    18-09-2025 16:03:51

पुणे : कोथरुड मतदारसंघ वाहतूककोंडी मुक्तीच्या दिशेने जलदगतीने पुढे जात असून; ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघातील बहुतांशी मिसिंग लिंकच्या कामाने गती मिळालेली आहे. त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. नुकतेच कोथरुड मतदारसंघातील बाणेर भागातील ननवरे चौक ते पॅन कार्ड रेखांकन पूर्ण झाले आहे. तर एकलव्य कॅालेज येथील मिसिंग लिंकचे काम पूर्ण करण्यासाठी २५०० स्क्वेअर फिट जागा महापालिकेला हस्तांतरित झाली आहे. 

कोथरुड मतदारसंघातील मिसिंग लिंक पूर्ण करुन वाहतूककोंडी मुक्त कोथरुडसाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि कोथरुडचे आमदार आग्रही असून; सदर  मिसिंग लिंकसाठी महापालिका आयुक्तस्तरावर सातत्याने पाठपुरावा करत आहे. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे मिसिंग लिंकसाठी जमीन अधिग्रहण तथा इतर अडचणी सोडवण्यास गती मिळाली आहे.

यापूर्वी एरंडवणे येथील रजपूत वीटभट्टी परिसरातील जमीन अधिग्रहित होऊन; रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तर सुतारवाडी भागातील रस्ता रुंदीकरणासाठी जमीन हस्तांतरण पूर्ण झाले आहे. याशिवाय बाणेर मधील ननवरे चौक ते पॅन कार्ड रेखांकन महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पूर्ण झाले आहे. तर कोथरुड मधील एकलव्य कॉलेज येथील रस्त्यासाठी २५०० स्क्वेअर फूट जागा महापालिकेकडे हस्तांतरित झाली असून,सदर रस्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगितले जात आहे. त्यामुळे वाहतूककोंडी मुक्त कोथरुडसाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश येताना दिसत आहे.


 Give Feedback



 जाहिराती