पुणे : त्रिभाषा धोरण समितीसमोर एक लोकप्रतिनिधी बापू पठारे यांनी मात्र त्यांच्या मतदारसंघात म्हणजे वडगाव शेरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय असल्यामुळे त्यांच्या सोयीसाठी हिंदी ही सुरुवातीपासून सक्तीची करावी अशा पद्धतीची भूमिका घेतली.
आम आदमी पार्टी अशा पद्धतीच्या बोटचेपेपणाच्या भूमिके चा निषेध करत. आमच्या महाराष्ट्रामध्ये व्यवसाय व इतर निमित्ताने येणाऱ्या इतर राज्यातील नागरिकांनी निश्चितपणे मराठीचा अवलंब आणि अंगीकार करायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे उत्तर भारतीयांच्या हिंदीच्या बुलडोझरला बळी पडण्याच्या या भूमिके चा आम आदमी पार्टी निषेध करते.त्याचबरोबर पुण्याच्या मराठी भागातील म्हणजे कोथरूड मधून आलेल्या आणि खासदार झालेल्या मेधा कुलकर्णी यांनी सुद्धा हिंदी पहिलीपासून सक्तीची करावी अशी भूमिका मांडली. ही भूमिका पालकांवरती आणि मुलांवरती अतिरिक्त ओझ निर्माण करणारी असून एखाद्या विषयाची आवड म्हणून मुलांनी तिसरी, चौथी भाषा शिकणे वेगळे आणि त्याची सक्ती करणे हे वेगळे हे त्यांनी समजून घ्यायला हवे.
केंद्र सरकारच्या भाजपच्या या एकसुरी आणि सांस्कृतिक सपाटीकरण करणाऱ्या भूमिकेचा आम आदमी पार्टी विरोध करते. हिंदी संस्कृतीचा बालवयात मारा हा मायबोली मराठीला मारक ठरेल अशी आम्हाला रास्त भीती आहे.त्यामुळे आम आदमी पार्टी तर्फे आम्ही पहिलीपासून तिसरी भाषा म्हणजे हिंदी भाषेच्या अप्रत्यक्ष सक्तीला विरोध करीत असल्याचे डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या त्रिभाषा धोरण समिती पुढे मांडले.
