सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाचा मोठा निर्णय, निकालाची नवी तारीखही जाहीर!
  • एकनाथ शिंदेंनी आणल्या पैशांच्या बॅगा; नव्या व्हिडीओने खळबळ, मालवणमध्ये शिवसेनेनंही पैसे वाटल्याचा माजी आमदाराचा दावा
  • मोठी बातमी: नगरपरिषदेच्या मतदानावेळी बोगस मतदार सापडले, दोनजण ताब्यात, गाड्या भरुन बोगस मतदार आणल्याची माहिती
  • नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होताच EVM मशीन धडाधड बंद पडल्या, अपक्ष उमेदवाराचं बटणचं दाबलं जाईना
 विश्लेषण

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या काही मतदारसंघातील सार्वजनिक सुट्टी रद्द

डिजिटल पुणे    02-12-2025 10:08:51

मुंबई:- नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत आहे. यापूर्वी मतदानाच्या दिवशीची जाहीर केलेली सुट्टी काही मतदारसंघात न्यायालयीन अपील दाखल झाल्यामुळे केवळ त्या मतदारसंघापुरती रद्द  करण्यात आली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी 16 जिल्ह्यांतील नगरपरिषद/नगरपंचायतीमध्ये सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे. यात ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, अहिल्यानगर (कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा), पुणे (बारामती, फुरसुंगी-उरुळी  देवाची), सोलापूर (अनगर, मंगळवेढा), सातारा (महाबळेश्वर, फलटण), छत्रपती संभाजीनगर (फुलंब्री), नांदेड (मुखेड, धर्माबाद), लातूर (निलंगा, रेणापूर), हिंगोली (वसमत), अमरावती (अंजनगावसूर्जी), अकोला (बाळापूर), यवतमाळ (यवतमाळ), वाशिम (वाशिम), बुलढाणा (देऊळगावराजा), वर्धा (देवळी) आणि चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस यांचा समावेश आहे, असे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.


 Give Feedback



 जाहिराती