सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांना मोठा झटका, मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
  • a: महाड नगरपरिषद निवडणुकीत तुफान राडा, भरत गोगावलेंच्या मुलाला रिव्हॉल्व्हर दाखवली, सुशांत जाबरेंना जबर मारहाण
  • मोठी बातमी : उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाचा मोठा निर्णय, निकालाची नवी तारीखही जाहीर!
  • एकनाथ शिंदेंनी आणल्या पैशांच्या बॅगा; नव्या व्हिडीओने खळबळ, मालवणमध्ये शिवसेनेनंही पैसे वाटल्याचा माजी आमदाराचा दावा
  • मोठी बातमी: नगरपरिषदेच्या मतदानावेळी बोगस मतदार सापडले, दोनजण ताब्यात, गाड्या भरुन बोगस मतदार आणल्याची माहिती
  • नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होताच EVM मशीन धडाधड बंद पडल्या, अपक्ष उमेदवाराचं बटणचं दाबलं जाईना
 शहर

पिंपळे सौदागर येथे कमर्शियल इमारतीमधील कोचिंग क्लासेस मध्ये आग!अग्निशमन विभागाच्या पथकाने आणली आटोक्यात; सहा जणांची सुखरूप सुटका

डिजिटल पुणे    02-12-2025 16:26:46

पिंपरी : पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोड येथील “प्राइम स्क्वेअर” इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एका प्रायव्हेट कोचिंग क्लासेस मध्ये आज दुपारी पावणे तीनच्या सुमारास अचानक आग लागली. अवघ्या काही मिनिटांत या आगीने रौद्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पिंपरी येथील मुख्य अग्निशमन केंद्रातील २ , थेरगाव उप अग्निशमन केंद्रातील १ आणि नेहरूनगर अग्निशमन केंद्रातील १ अग्निशमन पथकाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणत आगीमधून सहा जणांची सुखरूप सुटका केली.

अग्निशमन विभागाच्या पथकाने घटनास्थळी गेल्यानंतर त्वरित बचाव कार्यास सुरुवात केली. आगीच्या ज्वाळा आणि धूरामुळे जवानांना इमारतीमध्ये शिरकाव करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. परंतु जवानांनी साहस दाखवत इमारतीमध्ये प्रवेश करून इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आतमध्ये अडकलेल्या सहा जणांची सुखरूप सुटका केली. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये एकूण बेचाळीस विद्यार्थी होते. मात्र स्थानिकांनी अग्निशमन विभागास ताबडतोब थेट कॉल करण्यास दाखवलेली समयसूचकता आणि अग्निशमन विभागाने दाखवलेली तत्परता यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली व सुदैवाने मोठी दुर्घटना टाळण्यास अग्निशमन विभागास यश प्राप्त झाले.

या कारवाईमध्ये अग्निशमन विभागाचे वरिष्ठ अधिकारी ऋषिकांत चिपाडे, उप अग्निशमन अधिकारी विनायक नाळे, गौतम इंगवले, प्रभारी उपअधिकारी रुपेश जाधव, वाहनचालक मयूर कुंभार, विशाल बानेकर, दत्तात्रय रोकडे, मारुती गुजर, अग्निशमन विभागाच्या महिला कर्मचारी स्नेहा जगताप यांच्यासह इतर जवान सहभागी झाले होते.

दरम्यान, अशा प्रकारच्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी १०१ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अग्निशमन विभागाकडून करण्यात आले आहे.या आगीत संभाव्य नुकसानाची व्याप्ती खूप मोठी होती. सदर कमर्शियल बिल्डिंग मधील अन्य व्यवसायांच्या ग्राहकांची गर्दी असती तर आणि लगतच्या इमारतीमध्ये आग पसरली असती तर परिस्थिती वर नियंत्रण ठेवणे खूपच अवघड झाले असते. आमच्या नियंत्रण कक्षाला घटनेबाबत माहिती मिळाल्यापासून काही मिनिटांतच पथक रवाना झाले आणि पथकाने पूर्ण क्षमतेने काम केले आहे, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पिंपळे सौदागर परिसरात अग्निशमन केंद्राची नितांत आवश्यकता असून त्याबाबत वरिष्ठ स्तरावर कार्यवाही त्वरेने होणे आवश्यक असून आमच्या जवानांनी अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत ही आग आटोक्यात आणली आहे,


 Give Feedback



 जाहिराती