सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
  • तपोवनातील झाडं वाचवायला सयाजी शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला, नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक
 जिल्हा

उरण मध्ये मेमोग्राफी व पेप्समियर मोफत शिबिराचे आयोजन.

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    09-12-2025 10:18:54

उरण : श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था उरण, जायंट्स ग्रुप ऑफ उरण व इंडियन मेडिकल असोसिएशन उलवे मुंबई ओको केअर सेंटर (एमओसी) कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी मोफत मेमोग्राफी व पॅप्समेयर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते .हे शिबिर बालरोग तज्ञ मोरे  हॉस्पिटल आनंद नगर उरण येथे आयोजित केले होते. ३० लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. स्किनिंग मेमोग्राफी ही एक विशिष्ट प्रकारची ब्रेस्ट इमेजिंग आहे जी कमी डोसच्या एक्स-रे चा वापर करून कर्करोग लवकर ओळखते महिलांना लक्षणे दिसण्यापूर्वी जेव्हा तो सर्वात उपचार करण्यायोग्य असतो यावेळी लवकर निदान होऊन पुढील उपचारा करण्याकरता सोपे होते त्यामुळे महिलांसाठी ही टेस्ट करणे अतिशय गरजेचे आहे. स्तनाच्या कर्करोगाची तपासणी करण्यासाठी दरवर्षी मेमोग्राफी आणि क्लीनिकल ब्रिज तपासणी करणे वयाच्या ६५नंतर सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेऊन या टेस्ट  केल्या तर आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे.

यावेळी उरण मधील डॉक्टर वेल्फेअर असोसिएशनचे डॉक्टर विकास मोरे (अध्यक्ष), डॉ. कृष्णा बोरकर (सचिव), डॉ प्रदीप अटकरी (खजिनदार), डॉ सत्या ठाकरे, डॉ. मोना बोरकर डॉ. अजय कोळी,डॉ. घनश्याम पाटील, इंडियन मेडिकल असोसिएशन उलवे आदी मान्यवर डॉक्टरांच्या उपस्थितीत मेमोग्राफी शिबिर सोहळ्याचे उद्घाटन सुंदरीत्या पार पडले.उरण मधील पोलीस महिला कर्मचारी यांनी या शिबिरात आपली तपासणी करून घेऊन सुरुवात केली.या कार्यक्रमासाठी संगीता सचिन ढेरे( श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था उरण अध्यक्षा),  कविता म्हात्रे, वैशाली पाटील, मीना रावल, अभया म्हात्रे, तृप्ती भोईर, सुप्रिया सरफरे, श्रीमती प्रियवंदा तांबटकर, देवेंद्र पिंपळे, रोशनलाल मेहता या सर्वांचे महत्वाचे योगदान लाभले आहे.


 Give Feedback



 जाहिराती