सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
  • तपोवनातील झाडं वाचवायला सयाजी शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला, नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक
 शहर

आंतरराष्ट्रीय 'क्लिनिकल फार्मसी समिट -२०२५' उत्स्फुर्त प्रतिसाद ! भारती विद्यापिठ पूना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये आयोजन

डिजिटल पुणे    09-12-2025 13:20:51

पुणे : इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन (विद्यार्थी मंच) पुणे व फेडरेशन ऑफ क्लिनिकल फार्मसिस्ट इंडिया  पुरस्कृत 'आंतरराष्ट्रीय क्लिनिकल फार्मसी समिट-२०२५' चे आयोजन भारती विद्यापीठ पूना कॉलेज ऑफ फार्मसीने दि.५,६ व ७ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित केले होते. क्लिनिकल फार्मसी समिटचे हे सलग तिसरे वर्ष आहे.  प्रसिद्ध वैद्यकीय आणि नियामक व्यवहार युनिव्हर्सल न्यूट्रीसायन्स, मुंबईचे प्रमुख डॉ.मनीष गर्ग यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उदघाटन झाले. पूना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.आत्माराम पवार,उपप्राचार्य डॉ.वर्षा पोखरकर,फार्म.डी. विभागप्रमुख डॉ.आसावरी राऊत,आयोजन सचिव डॉ.हरिथा नाथ,आयपीएसएफचे अध्यक्ष प्रथमेश बोराना व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते .

रुग्णसेवेमध्ये क्लिनिकल फार्मसीचे महत्व अधोरेखीत करणे, क्लिनिकल फार्मासिस्टचा रूग्णोपचारामध्ये सहभाग व योगदान वाढावे, यासाठी विचार मंथन करण्यात आले. भारताच्या कानाकोपऱ्यातून ४०० हून अधिक क्लिनिकल फार्मासिस्ट व फार्म.डी.च्या विद्यार्थ्यांनी या अधिवेशनात सहभाग नोंदवला ."व्यावहारीक अनुप्रयोगाचे संशोधन, औषधोपचारासाठीचे व्यवस्थापन, औषधांच्या प्रतिकूल प्रतिक्रियांचे निरीक्षण ही मुलभूत तत्वे क्लिनिकल फार्मासिस्ट व फार्म.डी. विद्यार्थ्यांमध्ये रुजावे, हे या अधिवेशनाचे मुख्य उद्दीष्ट होते.

"रुग्णसेवेमध्ये क्लिनिकल फार्मासिस्टचे योगदान बहुमूल्य  आहे.त्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे.'असे मत डॉ. मनीष गर्ग यांनी मांडले. फार्मसी क्षेत्रातील व्यवसायाच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन (स्टुडंट्स फोरम) पुणे व भारती विद्यापीठ यांच्यावतीने असे उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे डॉ.मनीष गर्ग यांनी कौतुक केले.

 


 Give Feedback



 जाहिराती