सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गोरेगावातील जनतेसाठी नवी आशा, समाजसेवक संदीप जाधव यांच्यामुळे पाणीटंचाई आणि अंधाराचा प्रश्न सुटला
  • मस्साजोगमध्ये आजपासून 9 डिसेंबर काळा दिवस म्हणून पाळणार; अधिवेशनामध्ये संतोष देशमुख प्रकरणावर निवेदन दिलं जावं; धनंजय देशमुखांची मागणी
  • स्ट्राँग रुममध्ये EVM चा संशयास्पद आवाज, दोन्ही शिवसेनेचा आक्षेप, गोंधळानंतर आजपासून खडा पहारा
  • फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
  • उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; ZP अन् पंचायत समितीचा आढावा, मनसेबाबतही सूचना
 जिल्हा

एकात्मिक मोबाईल ॲपला अंतिम स्वरूप देण्यासाठी यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करावे – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

डिजिटल पुणे    09-12-2025 15:45:25

नाशिक :आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात येणारे भाविक, साधू, संत, महंत, पर्यटक व प्रशासकीय यंत्रणा यांना वापरासाठी एकात्मिक मोबाईल ॲप व वेब पोर्टल तयार करण्यात येत आहे. यात आवश्यक सर्व सेवा सुविधा अंतर्भूत करून ॲपला अंतिम स्वरूप देण्यासाठी यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहत आयोजित ब्रेनस्टॉर्मिंग सत्रात ते बोलत होते. यावेळी कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक नंदकुमार राऊत, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, त्र्यंबक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी  किरण भोसले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले की, कुंभमेळा काळात जगभरातील भाविक व पर्यटक नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येणार आहेत. त्यामुळे एकात्मिक स्वरूपाचे ॲप तयार करताना ते वापरकर्त्यांना वापरावयास सुलभ असावे. या ॲपमध्ये पार्कींगची ठिकाणे, भाविकांची गर्दीची घनता, हेल्पलाईन क्रमांक, रिअल टाईम सीसीटीव्ही, हॉस्पिटलची माहिती, बस व रेल्वेची वेळापत्रके, उपहारगृहांची माहिती, आरोग्य यंत्रणा, मुलभूत सोयीसुविधांची उपलब्धता यासारख्या अत्यावश्यक सेवांची माहिती अंतर्भूत असावी. पोलीस विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, मेक माय ट्रीप या ॲपच्या सुविधा भाविकांना प्राप्त होण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या वेब पोर्टलला एपीआय च्या माध्यमातून सुविधा देण्यात यावी. तसेच कुंभमेळा काळातील विशेष गरजा जसे एसओएस बटण, जीपीएस ट्रॅकिंग या सुविधांसह हे ॲप बहुभाषिक असावे. सर्वसमावेशक चर्चेतून यास अंतिम स्वरूप दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी ॲप तयार करणाऱ्या संस्थांनी प्रायोगिक तत्वावर तयार केलेल्या प्रणालीचे सादरीकरणातून सिंहस्थ काळात ॲपद्वारे देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली.


 Give Feedback



 जाहिराती