मुंबई : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर मागील काही दिवसांत अपघातांची मालिका वाढून चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे. चार दिवसांपूर्वी हातखंबा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता पुन्हा एक गंभीर अपघात घडला आहे. महामार्गाच्या कोंडमळा परिसरात उभ्या असलेल्या डम्परला मागून येणाऱ्या वाळूवरील डम्परने जोरदार धडक दिल्याने तीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत युवकाचे नाव अमित एकनाथ हुमणे (रा. आगवे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे असून तो कबड्डीपटू आणि महावितरणचा कर्मचारी होता.
कोकणातील होतकरू कबड्डीपटू अमित एकनाथ हुमणे (वय 30, रा. आगवे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) यांचा गोवा राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. कबड्डीमध्ये अनेक बक्षिसे मिळवलेल्या अमितच्या मृत्यूने परिसरात आणि कुटुंबात शोककळा पसरली आहे.
शनिवारी उशिरा रात्री हा भीषण अपघात घडला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कबड्डीमध्ये अनेक बक्षिसे मिळवलेल्या अमित हुमणे याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले आहे. चिपळूण तालुक्यातील आगवे गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
अपघात कसा झाला?
चिपळूणहून आगवेकडे निघालेला डम्पर चालक सुरेश दौलत हुमणे (वय 50) हे अमित हुमणे यांच्यासह प्रवास करत होते. कोंडमळा वळणाजवळ अंधारात शौकद अली (वय 50, रा. जयगड) यांनी कोणतेही सिग्नल, इंडिकेटर किंवा चेतावणी फलक न लावता डाव्या लेनमध्ये डम्पर उभा केला होता.अंधारामुळे उभा असलेला डम्पर न दिसल्याने सुरेश हुमणे यांच्या डम्परची त्यावर जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की केबिनमध्ये बसलेले अमित हुमणे यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक सुरेश हुमणे गंभीर जखमी आहेत.
चालकाविरुद्ध गुन्हा
धडक इतकी भयानक होती की केबिनमध्ये बसलेल्या अमित हुमणे याचा जागीच मृत्यू झाला. तर सुरेश हुमणे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच सावर्डे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. निरीक्षणात उभा डम्पर चुकीच्या पद्धतीने उभा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर चालक शौकद अली याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावर्डे पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.