सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • NDA II परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी UPSC चे सर्व्हर डाऊन, हेल्पलाईन डेस्कही बंद; विद्यार्थ्यांची तक्रार, मुदतवाढीची मागणी
  • धक्कादायक! तळेगाव MIDC मध्ये गॅस गळतीमुळं दोन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर, कामगारांमध्ये भीतीचं वातावरण
  • काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
  • महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
 शहर

भारतीय ज्ञान पद्धतीचा प्रसार व्हावा, ज्योतिषाला प्रयत्नांची जोड द्यावी: डॉ. मंगेश कराड

डिजीटल पुणे    09-06-2026 10:33:45

पुणे : ज्योती जोशी ज्योतिष इन्स्टिट्यूट आणि अभिजीत प्रतिष्ठान (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘साधना–सिद्धी गौरव महोत्सव २०२६’ आज पुण्यात उत्साहपूर्ण वातावरणात  झाला. कर्वे  रस्ता येथील हॉटेल प्रेसिडेंट येथे सकाळी ८.३० ते सायंकाळी ६ या वेळेत झालेल्या या महोत्सवात राज्यभरातील ज्योतिषशास्त्राचे विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक आणि गुरुजन मोठ्या संख्येने सहभागी झाले.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आचार्य महामंडलेश्वर महंत सुधीरदास पुजारी उपस्थित होते. उद्घाटक म्हणून एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्वागताध्यक्ष म्हणून पुंडलिक दाते यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी, ज्योतिषरत्न वेदमूर्ती गोरक्षनाथ पैठणकर गुरुजी,सौ.गौरी केंजळे,प्रिया मालवणकर,सुनील पुरोहित यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर  उपस्थित होते.सभागृहात चंद्रकांत शेवाळे,नंदकिशोर जकातदार,डॉ.नरेंद्र सहस्त्रबुद्धे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

महोत्सवात ज्योतिषशास्त्रातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच ज्येष्ठ ज्योतिषाचार्यांचा विशेष गौरव करून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. विविध मार्गदर्शनपर सत्रे, पुस्तक प्रकाशन, गुरुंचे आशीर्वचन आणि नव्या पिढीला ज्योतिष क्षेत्राकडे प्रेरित करणारे उपक्रम यांना उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.‘यशस्वी ज्योतिषी घडण्यासाठी कोणत्या शाखा अनिवार्य?’, ‘पुनर्विवाह योग कसे पाहावे?’, ‘जेमिनी महादशेचे गूढ विश्लेषण’, ‘टॅरो कार्ड आणि पुनर्जन्म’ अशा विविध विषयांवर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले. पारंपरिक ज्योतिष ज्ञान आणि आधुनिक दृष्टिकोन यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न या महोत्सवातून यशस्वीपणे साध्य झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

यावेळी  बोलताना डॉ.मंगेश कराड म्हणाले,'भारतीय ज्ञान पद्धतीवर विश्वास ठेवून ज्योतिषी काम करतात. या भारतीय शिक्षण पद्धतीला आता प्रतिष्ठा मिळाली आहे. हा गहन विषय असून वेद, पुराणाचा अभ्यास केला पाहिजे. ज्योतिष वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले जाते, याबद्दल ऋषी मुनीना धन्यवाद दिले पाहिजे. ही समाजातील महान शक्ती आहे. हा मोठा ठेवा आहे. तो जतन केला पाहिजे. प्रसार केला पाहिजे. आपली संस्कृती रूढी, परंपरा विसरली तर सगळे नष्ट होईल.संस्कृती नेण्याचे काम ज्योतिषाने केले पाहिजे. ज्योतिष पाहण्याबरोबर आयुष्याला  प्रयत्नांची जोड दिली पाहिजे. ज्योती जोशी ज्योतिष इन्स्टिट्यूट बरोबर एमआयटी एडीटी भारतीय ज्ञान  पद्धती आणि ज्योतिष विषयक अभ्यासक्रम एकत्रितपणे सुरू करण्याच्या विचारात आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कार्यकक्षेत हे अभ्यासक्रम परीक्षा घेतल्या जातील'.

महंत सुधीरदास पुजारी म्हणाले,' भारतीय संस्कृतीचे सामर्थ्य हे विज्ञान, अध्यात्म आणि अनुभवाधिष्ठित ज्ञान यांच्या सुंदर समन्वयात आहे. नव्या पिढीने अंधश्रद्धा नव्हे तर अभ्यास, विवेक आणि संस्कार यांच्या आधारावर ज्योतिषाकडे पाहिले पाहिजे. भारतीय प्रज्ञेचा हा अमूल्य वारसा समाजकल्याणासाठी जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे."गोरक्षनाथ पैठणकर म्हणाले,' कालगणनेवर जसे एकमत आहे, तसे सर्व ज्योतिषांना एकत्रित करून फलितावर एकमत केले पाहिजे. रिल, किंवा यू ट्यूब व्हिडिओ पाहून ज्योतिष शिकण्यापेक्षा प्रदीर्घ अभ्यासावर भर दिला पाहिजे.प्रास्ताविक करताना ज्योती जोशी म्हणाल्या,'आनंदी जगण्यासाठी ज्योतिषांनी समुपदेशन करावे. काळ कठीण असल्याने आज त्याची गरज आहे. ज्योतिषांच्या शब्दात जे सामर्थ्य आहे, त्यामागे ज्योतिष हे शास्त्र आहात. समाजासाठी दिशादर्शक व्हावे. आपल्या जातकाच्या जीवनात प्रकाश निर्माण करा'.


 Give Feedback



 जाहिराती