सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • धक्कादायक! तळेगाव MIDC मध्ये गॅस गळतीमुळं दोन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर, कामगारांमध्ये भीतीचं वातावरण
  • काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
  • महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
 शहर

मराठवाडा मित्र मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला राष्ट्रीय स्तरावर मानांकने

डिजीटल पुणे    09-06-2026 11:24:14

पुणे  : मराठवाडा मित्र मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने (एमएमसीओई) राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय विविध शैक्षणिक क्रमवारीत स्थान मिळवले आहे.प्राचार्य डॉ. सचिन साखरे,उपप्राचार्य  प्रा.स्वाती देशमुख यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.


'इंडिया एलिट एज्युकेशन अँड इन्स्टिट्यूशनल एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६' मध्ये महाविद्यालयाला ‘ट्रस्टेड अँड फ्युचरिस्टिक इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ द इयर – महाराष्ट्र’  हे मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच शैक्षणिक गुणवत्ता, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि प्रभावी अंमलबजावणी या क्षेत्रांतील उत्कृष्टतेसाठी महाविद्यालयाचा गौरव करण्यात आला.टाइम्स रँकिंग २०२६ मध्ये महाविद्यालयाने देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ६८ वा क्रमांक मिळविला आहे.याशिवाय आयआयआरएफ (इंडियन इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क) रँकिंग २०२६ मध्ये  चौथा, विभागीय स्तरावर चौथा आणि राष्ट्रीय स्तरावर पंधरावा क्रमांक मिळवत संस्थेने उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे.


संस्थेचे अध्यक्ष प्रा.बी.जी.जाधव तसेच संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाने या यशाबद्दल प्राचार्य,प्राध्यापक,कर्मचारी,विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.सातत्यपूर्ण शैक्षणिक गुणवत्ता,संशोधनाला दिलेले प्रोत्साहन,उद्योगाभिमुख शिक्षण, उत्कृष्ट प्लेसमेंट्स आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे उपक्रम यामुळेच हे यश शक्य झाल्याचे व्यवस्थापनाने नमूद केले.

भविष्यातही नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धती, संशोधन आणि उद्योगसहभाग यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.या विविध राष्ट्रीय मानांकनांमुळे मराठवाडा मित्र मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमध्ये गणना अधिक दृढ झाली असल्याची भावना व्यवस्थापन मंडळाने व्यक्त केली.


 Give Feedback



 जाहिराती