सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • NDA II परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी UPSC चे सर्व्हर डाऊन, हेल्पलाईन डेस्कही बंद; विद्यार्थ्यांची तक्रार, मुदतवाढीची मागणी
  • धक्कादायक! तळेगाव MIDC मध्ये गॅस गळतीमुळं दोन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर, कामगारांमध्ये भीतीचं वातावरण
  • काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
  • महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
 DIGITAL PUNE NEWS

उज्ज्वला योजनेतील अनुदान कपातीवर 'आप'चा हल्लाबोल; मोदी सरकारवर मुकुंद किर्दत यांची टीका

डिजीटल पुणे    09-06-2026 16:52:19

पुणे  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या प्रशासनाला 12 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने उज्ज्वला योजनेतील अनुदान कपातीच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. आम आदमी पक्षाचे नेते मुकुंद किर्दत यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

किर्दत म्हणाले की, उज्ज्वला योजनेतील लाभार्थी महिलांना मिळणारे 300 रुपयांचे अनुदान कमी करण्यात आले असून आता हे अनुदान वर्षभरात केवळ चार वेळाच मिळणार आहे. यामुळे सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याचा दावा त्यांनी केला.

तसेच, मागील वर्षी सुमारे 800 रुपयांना मिळणारा घरगुती गॅस सिलेंडर आता 950 रुपयांपर्यंत पोहोचला आहे, असे सांगत त्यांनी वाढत्या महागाईकडेही लक्ष वेधले. उज्ज्वला योजनेअंतर्गत अनुदानित गॅस सिलेंडरची संख्या आधी 12, त्यानंतर 9 आणि आता केवळ 4 करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

"सरकार गरिबांसाठीच्या योजना हळूहळू बंद करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. एका बाजूला बचतीचे आवाहन करायचे आणि दुसऱ्या बाजूला जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढवत राहायच्या, हे केंद्र सरकारचे धोरण असल्याचे चित्र आहे," अशी टीका किर्दत यांनी केली.

यावेळी त्यांनी सरकारच्या निर्णयाची तुलना 'हळूहळू उकळत्या पाण्यात बेडकाला मरणाच्या दारात नेण्याच्या प्रयोगाशी' करत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. मात्र, हा आम आदमी पक्षाचा राजकीय आरोप असून, याबाबत केंद्र सरकारची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.दरम्यान, उज्ज्वला योजनेतील अनुदान आणि गॅस सिलेंडरच्या किमतींच्या मुद्द्यावरून आगामी काळात राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती