सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सिनेमाच्या शूटिंगवेळी ‘किंग’च्या सेटवर शाहरुख खान जखमी, उपचारासाठी अमेरिकेला रवाना; चित्रपटाचे शूटिंग दोन महिने रखडणार
  • चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तीन महिला भाविक बुडाल्या; एकीचा अजूनही शोध सुरू;
  • चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तीन महिला भाविक बुडाल्या; एकीचा अजूनही शोध सुरू
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 DIGITAL PUNE NEWS

‘दिनो मोरियाने तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होईल’ : एकनाथ शिंदेंचा थेट विधानभवनातून ठाकरेंना इशारा

डिजिटल पुणे    17-07-2025 16:18:52

मुंबई : भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला थेट विधान भवनातून इशारा दिला आहे. मुंबईतील धारवी पुनर्विकास प्रकल्पासह इतर मुद्यावर बोलताना शिंदेंनी ठाकरे गटाला चांगलेच खडेबोल सुनावले. मिठी नदीततला गाळ काढण्याचं काम दिनो मोरिया करतो, तिथे यांना मराठी माणूस दिसला नाही. पण, दिनो मोरियाने तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होणार, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी थेट उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे..  

मिठी नदीततला गाळ कोण काढतोय, तर दिनो मोरिया. यांना गाळ काढायला मराठी माणूस दिसला नाही. तिथे यांना मोरे दिसला नाही. पण आता त्या मोरियाने तोंड उघडले तर कितीतरी लोकांचा मोरया होईल. म्हणून जे काचेच्या घरात राहतात ते दुसऱ्यांच्या घरावर दगडे मारत नाहीत अशा शब्दात शिंदेंनी विधानसभेत टोलेबाजी केली. कोविड महामारित खिचडी चोरणारे, डेडबॉडी चोरणारे आमच्यावर आरोप करत आहेत. कुणावर भ्रष्टाचाराचे आरोप करताय?,असा सवालही त्यांनी यावेळी केला.

मराठी माणसासाठी काय केलं असं म्हणत अनेकजण गळे काढतात, मात्र तो बाहेर का फेकला गेला याचं आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. कोणाच्या काळात हे बाहेर गेले, पत्राचाळीमध्ये कोणी माया गोळा केली? संक्रमण शिबिरात खुराड्यासारख ठेवण्यात आल ते मराठी माणस नाही का? असा सवाल एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, काही लोकांनी अर्धवट माहितीच्या आधारे मुद्दे मांडले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत, त्यामुळे कामं होत नाही असं सांगण्यात आलं. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोर्टात असल्याने घेता आल्या नाहीत. ⁠ओबीसी आरक्षण हेही महत्त्वाचं आहे.ओबीसी आरआरक्षणाशिवाय निवडणुका नको होत्या, मात्र आता कोर्टाने आदेश दिले आहेत. तसंच मिठी नदीच्या गाळाचा मुद्दा उपस्थित करत दिनो मोरियाला हे कंत्राट का दिलं, असा सवाल एकनाथ शिंदेंनी केला.

निवडणूक झाली नसली तरी कोणतंही काम थांबलेल नाही. मुंबईत बदल होत आहे. आमच्यासाठी मुंबईकर फर्स्ट आणि इतरांसाठी कंत्राटदार फर्स्ट आहेत. ⁠मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच चहल यांना बोलावले आणि खड्यांच्या संदर्भात सांगतील आणि त्यानंतर दोन फेजमध्ये सर्व रस्ते करण्याचे आदेश दिले. ⁠पहिला फेज पूर्ण झाला आहे, आपण ⁠काँक्रीटीकरण करत आहोत, त्यामुळे मुंबई खड्डेमुक्त होईल.मुंबईबाहेर फेकलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत येईल, क्लस्टरच्या माध्यमातून आपण अनेक योजना आणत आहोत. कोळी वाड्याच्याबाबत देखील आपण निर्णय घेतलाय, बदल घडवण्याचे काम आपण करतोय. धारावी हा जगातला सर्वात मोठा प्रकल्प आहे, आपण धारावीच्या विकासासाठी जमीन देतोय. पूर्वीच्या सरकारने निर्णय फक्त पात्र लोकांसाठी घेतला होता. पण आम्ही पात्र आणि अपात्र लोकांसाठी निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या जागेत प्लॅन सुरु झाला, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले. 

मराठी माणसासाठी काय केलं असं म्हणत अनेकजण गळे काढतात, मात्र तो बाहेर का फेकला गेला याचं आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. कोणाच्या काळात हे बाहेर गेले, ⁠पत्राचाळीमध्ये कोणी माया गोळा केली? संक्रमण शिबिरात खुराड्यासारख ठेवण्यात आलं ती मराठी माणसं नाहीत का? असा सवाल एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला. मुंबईतील रमाबाई नगरमध्ये भाडं दिलं जात नव्हतं, मी स्वत: चेक वाटून आलो. ⁠⁠गिरणी कामगारांच्या संदर्भात ही बैठक झाली. ⁠ज्यादा इन्सेटिंव देऊन त्यातून निर्माण होणारी घर गिरणी कामगारांना देण्यात येणार आहेत. 1 लाख लोकांचा आम्ही पहिल्यांदा सर्व्हे केला, ⁠किती पात्र लोक आहेत याची नोंद केल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती