सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सिनेमाच्या शूटिंगवेळी ‘किंग’च्या सेटवर शाहरुख खान जखमी, उपचारासाठी अमेरिकेला रवाना; चित्रपटाचे शूटिंग दोन महिने रखडणार
  • चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तीन महिला भाविक बुडाल्या; एकीचा अजूनही शोध सुरू;
  • चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तीन महिला भाविक बुडाल्या; एकीचा अजूनही शोध सुरू
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 DIGITAL PUNE NEWS

'हातवारे करू नका, आवाज खाली करा', रोहित पवारांचा पारा चढला,;शहाणपणा करू नका, बोलता येत नसेल तर बोलायचे नाही, पोलिस अधिकाऱ्यांना सुनावले

डिजिटल पुणे    18-07-2025 12:48:36

मुंबई : गुरुवारी विधानभवन परिसरात झालेल्या वादग्रस्त हाणामारीनंतर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनाच्या लॉबीत तुफान हाणामारी झाली आहे. यामुळे विधानभवन परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना आज विधानभवनाच्या परिसरात जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले. यावेळी गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश कटले याने जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांना मारहाण केली असून, शिवीगाळही करण्यात आली होती. 

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी एका पोलीस अधिकाऱ्यावर थेट संताप व्यक्त केला आणि त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गुरुवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थक नितीन देशमुख यांना मारहाण केली. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रात्री पोलिसांनी नितीन देशमुख यांना अटक केली. ही घटना समजताच जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार तातडीने मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात पोहोचले.

गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास नितीन देशमुख यांना अटक केल्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विधानभवन परिसरातच पोलिसांच्या गाडीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. रोहित पवारही यामध्ये सहभागी झाले होते. रात्री दीडच्या सुमारास पोलिसांनी आंदोलकांना बाजूला हटवत देशमुख यांना पोलिस ठाण्यात नेले.

या घटनेनंतर पवार समर्थकांनी पोलिसांना “साहेबांना हात लावायचा नाही” असा इशारा दिला होता. मात्र, जितेंद्र आव्हाड यांच्या मध्यस्थीमुळे पोलिस ठाण्यातील तणाव काहीसा निवळला. तरीही, रोहित पवार यांचा राग व्यक्त करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होतो आहे.

आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना अटक केल्याची माहिती समजताच जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या गाडीखालीच ठिय्या मांडत एक तास गाडी रोखून धरली. यावेळी पोलिसांच्या गाडीची समोरून मोडतोड झाल्याचे सुद्धा दिसून आले.  दरम्यान, नितीन देशमुख यांना कोणत्या पोलीस ठाण्यामध्ये नेलं आहे या संदर्भातील माहिती मिळत नसल्याने जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार यांच्याकडून शोध मोहीम सुरू होती. मात्र शोध लागत नसल्याने रोहित पवार यांचा पोलिसांसमोर संतापाचा पार चढल्याचा दिसून आले. त्यामुळे पोलिसांना रोहित पवार यांनी केलेली दमदाजी कॅमेरामध्ये कैद झाली आहे. रोहित पवार हे पीएसआयशी वाद घालताना दिसून येत आहेत. 

 

हा संपूर्ण प्रकार मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात घडला. यावेळी रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. एक पोलीस अधिकारी रोहित पवारांशी बोलताना हातवारे करत असल्याचे दिसताच पवारांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट सांगितले, “हातवारे करू नका… आवाज खाली ठेवा… शहाणपण करू नका…” अशा शब्दांत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावेळी रोहित पवार आणि एका पोलीस अधिकाऱ्यांत बाचाबाची झाली, ज्यात पवार आक्रमक होते. पोलीस अधिकाऱ्याने हातवारे करत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता रोहित पवार यांनी आवाज वाढवून शहाणपणा करू नका, बोलता येत नसेल तर बोलायचे नाही, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सुनावले आहे. आवाज खाली, हातवारे करुन आमदारासोबत बोलायचे नाही, असा इशारा देखील रोहित पवार यांनी दिला. 

 

 

 


 Give Feedback



 जाहिराती