सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पैशांवरून वाद विकोपाला, पतीकडून बिहार अन् कॅनडातून पत्र पाठवत पत्नीला 'तिहेरी तलाक' देण्याचा प्रयत्न; नाशिकमध्ये खळबळ
  • मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य, अमेरिकेचा संदर्भ
  • अजितदादा-शिंदेंसह 20 नेत्यांच्या अडचणी वाढल्या, मतदारांना प्रलोभनं देण्याच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल
  • उद्या निवडणुका अन् आज पुढे ढकलल्या ही चूक; देवेंद्र फडणवीसांचे निवडणूक आयोगावर आक्षेप
 शहर

पुणे विमानतळ देशात ‘टॉप २० मध्ये; आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत १९ वा क्रमांक

डिजिटल पुणे    02-12-2025 10:05:22

पुणे : देशात सर्वात वेगाने विकसित होत असलेल्या शहरांपैकी एक असलेल्या पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने देशातील प्रमुख विमानतळांच्या यादीत पुणे विमानतळाने १९ वा क्रमांक पटकावून ‘टॉप २०’ मध्ये स्थान मिळवले आहे. ही रँकिंग अलीकडेच ब्युरो ऑफ इमिग्रेशनने जाहीर केली.

लोहगाव येथे असलेले पुणे विमानतळ हे प्रामुख्याने संरक्षण खात्याच्या अखत्यारीत असून, विमानांच्या टेकऑफ आणि लँडिंगसाठी  वायुदलाची धावपट्टी वापरण्यात येते. त्यामुळे विमानतळाच्या विस्ताराला नैसर्गिक मर्यादा येतात. या सर्व कार्यात्मक अडचणी असतानाही पुणे विमानतळाने १९ वा क्रमांक मिळवला आहे. पुणे विमानतळाहून दुबई आणि बँकॉक अशा केवळ दोन सेवा सुरू असताना देखील पुण्याने १९ वे स्थान मिळवणे हे उल्लेखनीय यश ठरले आहे. ही रँकिंग पुणे विमानतळावर सुरू असलेल्या विविध विकासकामे आणि आंतरराष्ट्रीय संपर्क वाढविण्याची पुण्याची क्षमता आणि संधीही दाखवते.

पुणे शहर हे आधीच माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील मोठे केंद्र म्हणून ओळखले जाते आणि त्याचबरोबर चाकण एमआयडीसीमधून अनेक आंतरराष्ट्रीय वाहन कंपन्या कार्यरत असल्यामुळे पुणे ‘ऑटोमोबाईल हब’ म्हणूनही झपाट्याने विकसित होत आहे. विमानवाहतूक तज्ञांच्या मते, विद्यमान टर्मिनलचे उन्नतीकरण झाल्यामुळे प्रवाशांची सोय मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एरोमॉलसारख्या सुविधा व विस्तारित टर्मिनल इमारत उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांना आता सुलभ आणि सोयीसुविधांनी युक्त प्रवासाचा आनंद मिळत आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील नागरी विमान वाहतूक क्षेत्रात अभूतपूर्व वाढ झाली आहे. गेल्या ११ वर्षांत केंद्र सरकारने अनेक नवी विमानतळे उभारली, तसेच विद्यमान विमानतळांवरही मोठ्या प्रमाणावर उन्नतीकरणाची कामे करण्यात आली. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ त्याचे उत्तम उदाहरण आहे. गेल्या काही वर्षांत विमानतळावरील सुविधा आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या अपेक्षांनुसार मोठ्या प्रमाणात उन्नत झाल्या आहेत.”

 


 Give Feedback



 जाहिराती