सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाचा मोठा निर्णय, निकालाची नवी तारीखही जाहीर!
  • एकनाथ शिंदेंनी आणल्या पैशांच्या बॅगा; नव्या व्हिडीओने खळबळ, मालवणमध्ये शिवसेनेनंही पैसे वाटल्याचा माजी आमदाराचा दावा
  • मोठी बातमी: नगरपरिषदेच्या मतदानावेळी बोगस मतदार सापडले, दोनजण ताब्यात, गाड्या भरुन बोगस मतदार आणल्याची माहिती
  • नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होताच EVM मशीन धडाधड बंद पडल्या, अपक्ष उमेदवाराचं बटणचं दाबलं जाईना
 शहर

विधान परिषद उपसभापती नीलमताई गो-हे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; बैठकीत मालधक्का चौक स्मारक जागा तात्काळ हस्तांतरित करा ठोस मागणी

डिजिटल पुणे    02-12-2025 12:58:38

पुणे : दिनांक ०१ डिसेंबर २०२५ रोजी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलमताई गो-हे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथील कौन्सिल हॉलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक विस्तारीकरण भवन जागे संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मालधक्का चौक येथील स्मारकासाठी राखीव असलेली जागा तात्काळ हस्तांतरित करून एन जी व्हेन्चरसोबत झालेला भाडेकरार रद्द करण्याची ठाम मागणी करण्यात आली.

या बैठकीत आजाद समाज पार्टी (कांशीराम) तर्फे सक्रिय सहभाग नोंदवण्यात आला. राजू कांबळे – पुणे जिल्हा अध्यक्ष (पश्चिम विभाग), सलीम सलगर – पुणे जिल्हा महासचिव (पश्चिम विभाग), किशोर निकाळजे – पुणे जिल्हा उपाध्यक्ष (पश्चिम विभाग), संजय कांबळे – पुणे शहर अध्यक्ष, सतेज गायकवाड – पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष, सारिका सलगर – पुणे शहर उपाध्यक्ष उपस्थित राहिले.

तसेच समितीचे समन्वयक शैलेंद्र मोरे, दीपक गायकवाड, नीता ताई अडसुळे, स्वाती ताई गायकवाड (पश्चिम महाराष्ट्र महासचिव), अर्चना ताई केदारी (पुणे जिल्हा प्रभारी), आनंद घेडे, संजय ओव्हाळ, निखिल दुर्गाई, सागर वानखेडे, सविता गायकवाड, अनुराधा बनसोडे, जुलेखा खान, सुजाता ताई नाईकवडे, मंदा गायकवाड, सोनी माछरेकर, संध्या चव्हाण, नीता कांबळे, सोफिया दास, वेंकी गंगावणे इत्यादी समन्वय समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेच्या वतीने मिलिंद भाऊ अहिरे, नितीन पवार, सुदर्शन त्रिगुणाईत तसेच विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांचे कार्यकर्तेही उपस्थित राहून आंबेडकरी समाजाच्या भावना आणि मागण्या ठामपणे मांडल्या.


 Give Feedback



 जाहिराती