सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • संजूच्या जिद्दीचा विजय; आयसीसी 'प्लेयर ऑफ द मंथ' किताबावर आता सॅमसनचंच नाव, रचला इतिहास
  • मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
 क्राईम

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर अत्याचार; बुलढाण्यात संतापाचा उद्रेक

डिजिटल पुणे    08-04-2026 17:30:53

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात एका प्राथमिक शाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे. लोणी गवळी गावातील शाळेत तिसरीत शिकणाऱ्या 9 वर्षीय विद्यार्थिनीवर एका 58 वर्षीय शिक्षकाने गैरवर्तन केल्याचा आरोप समोर आला आहे. ही घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिक मोठ्या संख्येने शाळेकडे धावले. संतप्त ग्रामस्थांनी संबंधित शिक्षकाला पकडून मारहाण केली. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले असून डोनगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत आरोपीला ताब्यात घेतले.

दरम्यान, आरोपीला ताब्यात घेताना काही काळ गावकऱ्यांनी विरोध केला, त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आरोपीला पोलीस ठाण्यात नेले.

सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे संबंधित शिक्षक येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


 Give Feedback



 जाहिराती