सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • NDA II परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी UPSC चे सर्व्हर डाऊन, हेल्पलाईन डेस्कही बंद; विद्यार्थ्यांची तक्रार, मुदतवाढीची मागणी
  • धक्कादायक! तळेगाव MIDC मध्ये गॅस गळतीमुळं दोन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर, कामगारांमध्ये भीतीचं वातावरण
  • काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
  • महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
 राज्य

कॉकरोच जनता पार्टीच्या जंतरमंतर आंदोलनाला पोलिसांची परवानगी; अभिजीत दिपके भारतात दाखल होताच मोठे यश

डिजीटल पुणे    06-06-2026 11:03:00

नवी दिल्ली : देशातील परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीला मोठा दिलासा मिळाला आहे. पक्षाने जंतरमंतर येथे आयोजित केलेल्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी अधिकृत परवानगी दिली असून, पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके भारतात पोहोचताच ही महत्त्वाची घडामोड घडली आहे.

दिल्ली पोलिसांच्या परवानगीनुसार, 6 जून रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जंतरमंतर येथे आंदोलन करण्यात येणार आहे. परवानगी मिळाल्यानंतर अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावरून समर्थकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.

अमेरिकेतून दिल्लीत दाखल झालेल्या दिपके यांच्या स्वागतासाठी विमानतळावर समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी त्यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक असल्याने त्याचीही चर्चा रंगली.

आंदोलनादरम्यान शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करत दिपके यांनी समर्थकांना थेट जंतरमंतरवर पोहोचण्यास सांगितले. संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर गर्दी न करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या आंदोलनाची प्रमुख मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आहे. विविध राष्ट्रीय परीक्षांमधील कथित त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांवर सरकारने उत्तर द्यावे, अशी भूमिका कॉकरोच जनता पार्टीने घेतली आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. जंतरमंतर आणि परिसरातील संवेदनशील भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस व निमलष्करी दल तैनात करण्यात आले असून, प्रमुख मार्गांवर बॅरिकेडिंग आणि वाहन तपासणी सुरू आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे देशभरातील विद्यार्थी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती