सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • NDA II परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी UPSC चे सर्व्हर डाऊन, हेल्पलाईन डेस्कही बंद; विद्यार्थ्यांची तक्रार, मुदतवाढीची मागणी
  • धक्कादायक! तळेगाव MIDC मध्ये गॅस गळतीमुळं दोन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर, कामगारांमध्ये भीतीचं वातावरण
  • काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
  • महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
 राज्य

अभिजीत दीपके भारतात दाखल; ‘कॉकरोच जनता पार्टी’चे पहिले आंदोलन सुरू, धर्मेंद्र प्रधानांवरील पोस्टरची चर्चा

डिजीटल पुणे    06-06-2026 13:04:04

नवी दिल्ली : ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक आणि अध्यक्ष अभिजीत दीपके अमेरिकेतून भारतात दाखल झाले असून त्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आपल्या संघटनेचे पहिले आंदोलन सुरू केले आहे. NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहारांच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनातून करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान केलेल्या टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर ‘कॉकरोच जनता पार्टी’ ही सोशल चळवळ चर्चेत आली होती. सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर या चळवळीने आता प्रत्यक्ष आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

अभिजीत दीपके आज सकाळी दिल्ली विमानतळावर पोहोचले. त्यांच्या स्वागतासाठी अनेक तरुण विमानतळावर उपस्थित होते. भारतात आगमनानंतर त्यांनी हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक धरलेले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

जंतर-मंतरवरील आंदोलनस्थळी धर्मेंद्र प्रधान यांचा फोटो असलेली पोस्टर्सही चर्चेचा विषय ठरली. ‘बेटा, तुमसे ना हो पाएगा...’ असा मजकूर असलेल्या पोस्टर्ससह अनेक युवक-युवती आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसून आले.

दिल्ली पोलिसांनी 6 जून रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आंदोलनाची परवानगी दिली आहे. या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर तरुणांचा प्रतिसाद मिळत असून अनेकजण याकडे देशातील पहिल्या मोठ्या ‘जेन-झी’ आंदोलनाच्या रूपात पाहत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती