सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • NDA II परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी UPSC चे सर्व्हर डाऊन, हेल्पलाईन डेस्कही बंद; विद्यार्थ्यांची तक्रार, मुदतवाढीची मागणी
  • धक्कादायक! तळेगाव MIDC मध्ये गॅस गळतीमुळं दोन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर, कामगारांमध्ये भीतीचं वातावरण
  • काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
  • महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
 शहर

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी : भिडे पूल ५ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

डिजीटल पुणे    09-06-2026 17:42:15

पुणे : पुणे शहरातील डेक्कन जिमखाना परिसर आणि मध्यवर्ती पेठांना जोडणारा मुठा नदीवरील महत्त्वाचा बाबा भिडे पूल सोमवार (९ जून) मध्यरात्रीपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पादचारी पुलाच्या बांधकामासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, हा बंद कालावधी ५ सप्टेंबर २०२६ पर्यंत असणार आहे.

महामेट्रोकडून डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला शनिवार पेठ आणि नारायण पेठ परिसराशी जोडण्यासाठी नदीपात्रात नवीन पादचारी पूल उभारण्यात येत आहे. वनाझ ते रामवाडी मेट्रो मार्गिकेवरील प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे काम हाती घेण्यात आले आहे.

बांधकामादरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पुणे वाहतूक पोलिसांनी या कामासाठी महामेट्रोला ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे पुढील तीन महिन्यांसाठी भिडे पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.

दरम्यान, नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी प्रशासनाने पर्यायी वाहतूक व्यवस्था केली आहे. नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला असून, डेक्कन आणि पेठ परिसरात ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनी संभाजी पूल (लकडी पूल), बालगंधर्व पूल आणि झेड ब्रिज या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.या विकासकामाला नागरिकांनी सहकार्य करावे तसेच संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रवासाचे नियोजन करून घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती