सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आमरण उपोषणासाठी बसलेल्या अभिजित दिपकेंवर महिलेकडून शाईफेक; पाचशे-पाचशे देऊन गुंडाना आंदोलनात घुसवलं जातंय, दिपकेंचा गंभीर आरोप
  • सोनम वांगचुकांना ताब्यात घेताच शरद पवारांचा केंद्रावर घणाघात; 'हा उद्दामपणा, आंदोलन दडपता येणार नाही'
  • देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
  • देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
  • सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आजचा 21वा दिवस; मनोज जरांगेंकडून आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, विद्यार्थी महत्त्वाचे की मंत्री?
 शहर

महापौर मंजुषा नागपुरे यांच्या उपस्थितीत खडकवासला धरणाचे जलपूजन; पुणेकरांच्या वर्षभराच्या पाणीपुरवठ्यासाठी प्रार्थना

डिजिटल पुणे    08-07-2026 16:27:03

पुणे : खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने जलपूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या उपस्थितीत जलदेवतेला साडी, चोळी आणि नारळ अर्पण करून जलसंपदेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी पुणेकरांना वर्षभर मुबलक व नियमित पाणीपुरवठा व्हावा तसेच शहरावर पाण्याची कोणतीही टंचाई येऊ नये, अशी प्रार्थना करण्यात आली.

पावसाळ्यात धरण पूर्ण भरल्यानंतर जलस्रोतांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्या परंपरेचा भाग म्हणून हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. जलसंधारणाचे महत्त्व, पाण्याचा जबाबदारीने वापर आणि नैसर्गिक संसाधनांबाबत जनजागृती करण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला.

या कार्यक्रमास आमदार भीमराव (अण्णा) तापकीर, उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेवक सोपान काका चव्हाण, सचिन मोरे, प्रसन्न दादा जगताप, सुभाष नाणेकर, भारत भूषण बराटे, नगरसेविका कोमल नवले, जयश्री भुमकर, सहकारी नगरसेवक, स्थानिक नागरिक, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 


 Give Feedback



 जाहिराती