सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन

डिजिटल पुणे    18-03-2023 12:31:32

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन शनिवारी (18 मार्च) सकाळी कोल्हापूर याठिकाणी झालं आहे. भालचंद्र कुलकर्णी यांच्या निधनानंतर मराठी कलाविश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भालचंद्र कुलकर्णी यांच्या निधनानंतर अनेक चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. सध्या सर्वत्र भालचंद्र कुलकर्णी यांच्या निधनाची चर्चा सुरू आहे. 

भालचंद्र कुलकर्णी हे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक होते. चित्रपट महामंडळाने त्यांना चित्रभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ‘ब्रँड कोल्हापूर’च्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. हा त्यांचा अखेरचा पुरस्कार ठरला. 

भालचंद्र यांनी जुन्या मराठी सिनेमांचा समृद्ध काळ जवळून बघितला आहे. याशिवाय डॉ. श्रीराम लागू, ,लक्ष्मीकांत बेर्डे अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी अभिनय केला होता. 

 


 तुमची प्रतिक्रिया जाहिराती