सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 शहर

सत्तर लाख रुपयांचा गुटखा जप्त, पोलिसांची दमदार कारवाई

जीवन सोनावणे    26-05-2023 16:41:49

खेड शिवापूर : राजगड पोलीस स्टेशन हद्दीत शिवापूर टोल नाका येथे मोठ्या प्रमाणात गुटखा पकडला असून ही कारवाई राजगड पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात आली आहे . राजगड पोलीस ठाणे अंतर्गत केलेल्या कारवाईत तब्बल 70 लाख रुपयांचा गुटखा व एक लाल आयशर टेम्पो त्याचा नंबर एम. एच. 11 सीजे 4075 जप्त करण्यात आला आहे. मधूकर लवटे, चेतन दत्तात्रय खांडेकर या दोघांनी प्रतिबंधीत अन्न पदार्थांची विक्री करीता वाहतुक केल्याने या आरोपीस अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की 25 तारखे रोजी मौजे खेडशिवापुर ता हवेली जि.पुणे येथे खेडशिवापूर टोल नाका येथे नामदेव मधूकर लवटे, वय. 28 वर्षे रानिजापूर ता. सांगोला, जि. सोलापूर, चेतन दत्तात्रय खांडेकर, वय. 19 वर्षे धंदा. टान्सपोर्ट, रा दत्त मंदिराजवळ, सुतारदरा, कोथरुड, पुणे, मूळ रा. निजामपूर, ता. सांगोला, जि. सोलापूर या दोघांनी प्रतिबंधीत अन्न पदार्थांची विक्री करीता वाहतुक करत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार खेड शिवापूर टोल नाका या ठिकाणी सापळा रचून दोन आरोपी व या कारवाईत तब्बल 70 लाख रुपयांचा गुटखा व एक लाल आयशर टेम्पो त्याचा नंबर एम. एच. 11 सीजे 4075 जप्त करण्यात आला आहे. वाहतूक करणाऱ्या दोन आरोपी सहित शकीर निसार, अलीमटटी विजापूर कर्नाटक, सददाम मेहबुब कोतवाल, मॅनेजर, रा मंगोली, विजापूर कर्नाटक या दोघांनी प्रतिबंधीत अन्नपदार्थांचा पुरवठा केला असल्यामुळे भा.दं.वि कलम 328, 188, 272, 273, 34 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 व त्या अंतर्गत नियम व नियमाचे 2011 कलम 26 (2) (प), 26 (2) (अप), 27 (3) (क), 27 (3) (म), अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम 59 चे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई ही अंकित गोयल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर तानाजी बरडे, सचिन पाटील पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली मनोजकुमार नवसरे, नितीन खामगळ, पो. ह महेश खरात, पो हवा. राहुल कोल्हे, पो.ना राहुल किर्वे, गणेश लडकत यांनी केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे हे करीत आहेत. सदर कारवाईची फिर्याद बालाजी भौग्लर शिंटे अगर अधिकारी यांनी दिली जाते


 तुमची प्रतिक्रिया जाहिराती