सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

'दंगल' फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचे निधन ; १९व्या वर्षी ठरले 'हे' मृत्यूचे कारण

पुजा    17-02-2024 14:12:19

फरिदाबाद : 'दंगल' चित्रपटाच्या चाहत्यांसाठी  एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. दंगल चित्रपटात आमिर खानच्या धाकट्या मुलीची म्हणजे ज्युनियर बबिता फोगट हिची भूमिका साकारणारी आणि फरिदाबादची रहिवासी अभिनेत्री सुहानी भटनागर हिचे आजारपणामुळे निधन झाले आहे. वयाच्या १९व्या वर्षी सुहानीने अखेरचा श्वास घेतला. तिच्या अशा निधनाने तिच्या आई- वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लोक सुहानीला दंगल गर्ल म्हणूनही ओळखत होते. या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, काही काळापूर्वी सुहानीचा अपघात झाला होता, त्यामुळे तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. सुहानीने उपचारासाठी घेतलेल्या औषधांचे असे दुष्परिणाम झाले की तिच्या शरीरात हळूहळू पाणी साचले. तिला दिल्लीतील एम्स रुग्णालयात बराच काळ दाखल करण्यात आले होते. मात्र तिच्या औषधोपचारांचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर तिने या जगाचा निरोप घेतला. 

सुहानी भटनागर बद्दल सांगायचे झाले तर, ती सुहानी भटनागर ही बॉलिवूडची प्रसिद्ध बालकलाकार होती. आमिर खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'दंगल' (२०१६) मधून तिला प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात तिने ज्युनियर बबिता फोगटची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. तिने अनेक टीव्ही जाहिरातींमध्येही काम केले होते. दंगलनंतर तिने अभ्यासासाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती पुन्हा अभिनयाकडे परतणार होती. पण आता तिचं हे स्वप्न स्वप्नच राहिलं आहे.


 तुमची प्रतिक्रिया जाहिराती