सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • भारताच्या हरविंदर सिंगला गोल्ड मेंडल
  • नाना पाटोळे आंदोलन स्थळी दाखला
  • पुतळा कोसळल्या प्रकरणी माफी मागतो : मुख्यमंत्री
  • पासपोर्ट ची वेबसाईट चार दिवस बंद राहणार, आज गुरूवार २९ ॲागष्ट ते २ सप्टेबंर सायंकाळी ६ पर्यत
  • आज जागतीक क्रीडा दिन
  • पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली ,दोन ते तीन वाहने वाहून गेल्या
  • शिवसेना समोर सकाळी ११ वाजता आंदोलन
  • वणी विधानसभेसाठी मनसेची राजू उंबरकर यांना जाहीर
  • राहूल गांधी यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करा : सुब्रम्हनयम स्वामी
  • भारताला ॲालंपीक मधे कांस्य पदक
 शहर

उमेद फाऊंडेशनने सुरु केलेला उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून या उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

डिजिटल पुणे    22-01-2025 17:51:54

पुणे : पुण्यातील उमेद फाऊंडेशन ही संस्था समाजातील दिव्यांग मुलांसाठी काम करणारी संस्था आहे. दिव्यांग मुलांच्या शारिरीक आणि बौद्धिक विकासासाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी 'बालक पालक' हा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प संस्थेच्या वतीने सुरू करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. 

उमेद फाऊंडेशनने सुरु केलेला उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून या उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केले. यासोबतच त्यांनी संस्थेला शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी सुहासराव हिरेमठ, साहित्यिक अच्युत गोडबोले यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती