सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • परिस्थिती हातळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस
  • अफवावर विश्वास ठेवू नका ,कायदा.हातात घेवू नका,समाज कंठक याचा फायदा घेत आहेत
  • नागपूरात महाल परिसरात दोन गटात दगडफेक ,जाळपोळ ,दगडफेकीत पोलीस जखमी
  • पोलीस कर्मचारी जखमी
  • औरंगजेबाच्या कबरी वरून वाद
  • पोलीसांचा फौज फाटा दंगल स्थळी दाखल
  • मुख्यमंत्री फडवणीस यांनी केले शांततेचे अवाहन
  • नागपूरात महाल दोन गटात दगडफेक ,जाळपोळ ,दगडफेकीत पोलीस जखमी
 जिल्हा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना होळी आणि धुलिवंदनाच्या दिल्या शुभेच्छा!

डिजिटल पुणे    13-03-2025 18:13:34

मुंबई : भारतीय संस्कृतीत सण, उत्सवातून निसर्ग रक्षणाचा मंत्र जपला जातो. हा संदेश घेऊनच आपण पर्यावरणपूरकरित्या सण साजरा करूया. विकसित भारतातील, विकसित महाराष्ट्र पर्यावरणीय दृष्ट्या समृद्ध होईल, असा प्रतिज्ञा घेऊया, असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, महाराष्ट्र विकासाच्या पथावर अग्रेसर आहे. या सकारात्मक वाटचालीत येणाऱ्या आव्हानांवर मात करण्याची प्रेरणा या सणांकडून घेऊया. उत्सव साजरा करताना, पर्यावरणाचा आदर करण्याचा वसा आपल्या संस्कृतीने दिला आहे. हा वसा आपण निर्धाराने पुढे नेऊया.

या उत्सवांच्या काळात वृक्ष जतन, जलसुरक्षा- जलसंवर्धन, नैसर्गिक संसाधनांचे रक्षण आणि पर्यावरणपूरक घटकांचा वापर करूया. यातून जल- वायू आणि ध्वनी प्रदूषण टाळूया. याशिवाय या सण-उत्सवांच्या निमित्ताने परस्पर आदर, स्नेह-भाव वृद्धिंगत व्हावा, यासाठी प्रयत्न करूया. सामाजिक-सलोखा आणि शांती-सौहार्द कायम राखण्याची आपली परंपरा आहे. ही आणखी दृढ व्हावी, यासाठी एकजूटीने आणि निर्धारपूर्वक प्रयत्न करूया. या सगळ्यातून आपला विकसित महाराष्ट्र पर्यावरणीयदृष्ट्या समृद्ध होईल, यासाठी कटिबद्ध राहूया, अशी भावना व्यक्त करून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती