सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 शहर

पूना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसमध्ये पदवीदान समारंभ

डिजिटल पुणे    10-02-2023 12:41:10

पुणे : पूना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस मध्ये व्यवस्थापनशास्त्र(एमबीए) विद्यार्थ्यांसाठी  पदवीदान समारंभ आणि वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.हनी अहमद फरीद (सचिव,वाय अँड एम अंजुमन खैरुल इस्लाम ट्रस्ट) आणि डॉ.हनीफ लकडावाला (अध्यक्ष,पूना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस )हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. इन्स्टिट्यूटच्या संचालक डॉ पोरिणीता बॅनर्जी यांनी स्वागत केले आणि इन्स्टिट्यूटच्या प्रगतीचा आढावा घेतला.हनी अहमद फरीद,डॉ.हनीफ लकडावाला यांनी विध्यार्थ्यांना त्यांच्या भाषणातून शुभेच्छा दिल्या.उपस्थित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि पारितोषिके देण्यात आली.डॉ झरीना शेख यांनी आभार मानले.विद्यार्थी,प्राध्यापक वर्ग,माजी विद्यार्थी या समारंभाला  उपस्थित होते.


 तुमची प्रतिक्रिया जाहिराती