सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

अण्णासाहेब मगर महाविद्यालयाला क्विकहिल फाउंडेशनच्या वतीने सायबर शिक्षा चॅम्पियन अवॉर्ड

MSK    17-02-2023 17:07:15

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागाच्या वतीने अनेकविध उपक्रम घेतले जातात आणि याची फलश्रुती म्हणजे महाविद्यालयाला नुकताच मिळालेला पुरस्कार. अण्णासाहेब मगर महाविद्यालयाला क्विकहिल फाउंडेशन यांच्या वतीने सायबर शिक्षा चॅंम्पियन ऑफ  द इयर̎ या पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रतिभा महाविद्यालय चिंचवड येथे नुकत्याच संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून क्विकहिल फाउंडेशनच्या चेअरपर्सन श्रीमती अनुपमा काटकर तसेच प्रतिभा महाविद्यालयाचे श्री. दिपक शहा उपस्थित होते. अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ  नितीन घोरपडे यांनी हा पुरस्कार श्रीमती अनुपमा काटकर यांच्या हस्ते स्विकारला. याप्रसंगी महाविद्यालयातील समन्वयक प्रा. मनिषा जगदाळे, प्रा. मनिषा गाडेकर, प्रा. दिपाली माळी उपस्थित होत्या.

 क्विकहिल फाउंडेशनच्या वतीने आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा घेतल्या जातात आणि त्यामध्ये सोशल मिडिया, उत्कृष्ट विद्यार्थी, उत्कृष्ट शिक्षक असे पुरस्कार दिले जातात. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे यांनी महाविद्यालयामध्ये 2020-21 या वर्षापासून क्विकहिल फाउंडेशनच्या वतीने कोर्स घेतले जात असल्याची माहिती दिली. यामध्ये सायबर शिक्षा अंतर्गत सायबर शिल्ड या विषयावरील ऑनलाईन कोर्समध्ये 1 शिक्षक आणि 100 विद्यार्थी, तर स्ट्रॉंग पासवर्ड यामध्ये 51 विद्यार्थी सहभागी झाल्याचे सांगितले. तसेच क्विकहिल फाउंडेशनच्या वतीने शिक्षकंाना प्रशिक्षण, विद्यार्थी कौशल्य विकास अंतर्गत ऑनलाईन उपक्रम, प्रकल्प पूर्ण केल्यानंतर ई प्रमाणपत्र, विद्याथ्र्यांसाठी ओरिएंटेशन कोर्स, वेबिनार, तज्ञ मार्गदर्शन मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली. संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. मनिषा जगदाळे यांनी हा पुरस्कार ही अभिमानाची बाब असून विद्यार्थी आणि शिक्षक यांनी यासाठी कष्ट घेतल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षात 2022 मध्ये महाविद्यालयातील 30 सप्टेंबर ते 20 डिसेंबर 2022 या काळात प्रकल्प पूर्ण केला असून त्यामध्ये 30 विद्याथ्र्यांनी प्रतिनीधी म्हणून, 3 शिक्षकांनी  मेंटॉर म्हणून काम केले असून 73 शाळांमध्ये हा प्रकल्प आयोजित केला गेला. यामध्ये 164 पे्रझेंटेशन दिली आणि 33703 विद्यार्थी सहभागी झाले. 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी  या गोष्टीचा आनंद व्यक्त केला असून सायबर सुरक्षा ही काळाची गरज आहे, तसेच संगणक क्षेत्रात येत्या काळात मोठया प्रमाणावर संधी उपलब्ध होणार असून विद्याथ्र्यांना प्रशिक्षण देण्याचे काम क्विकहिल फाउंडेशन च्या वतीने केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. महाविद्यालयाला पुरस्कार मिळाल्याबदृदल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मा. श्री राजेंद्र घाडगे, मानद सचिव मा. अॅड. संदीप कदम, खनिजदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव मा. एल. एम पवार, सहसचिव मा. ए. एम जाधव यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती