श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी सोलापूर संचालित श्री सिध्देश्वर वीरशैव पौरोहित्य पाठशाला सोलापूर आज रोजी पालक मेळावा घेण्यात आले.
श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी अध्यक्ष श्री धर्मराज काडादी यांच्या अध्यक्षतेखाली आणि पाठशाळेचे मार्गदर्शक अखील वीरशैव लिंगायत जंगम अर्चक पुरोहित महासभा संस्थाचे संस्थापक, अध्यक्ष डॉ.शिवयोगी शास्त्री होळीमठ यंच्या मार्गदर्शनाखाली जंगम पाठशाळा पालक मेळावा आयोजन करण्यात आले होते .
सन २०१५ पासुन वीरशैव जंगम वैदिक पाठशाळा चालू आहे तरी आज रोजी १०वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन केले व पाठशाळा विद्यार्थी आणि पालकांचे ऊत्तम प्रतिसाद मिळत असून
जंगम विद्यार्थी संख्या वाढत आहे व अभ्यास व जास्त जास्त प्रमाणात महाराष्ट्रातील सर्व गरीब जंगम विद्यार्थ्यांना सोय उपलब्ध करून देण्यात यावं या विषय चर्चा करण्यात आले .
देवस्थान समितीस सर्व पालक व विद्यार्थी कडून शुभेच्छा देण्यात आले.
या सभेत श्री सिद्धेश्वर देवस्थानचे पंच गुरुराज माळगे मालक व डॉ श्री वे मु शिवयोगीशास्त्री होळीमठ श्री सिद्धेश्वर देवस्थान पौरोहित्य पाठशाला मुख्य कार्यकारी अधिकारी व पाठशाळेचे प्रमुख शास्त्री प्रदिप जंगम, पौरोहित्य पाठशाला चे व्यवस्थापक श्री वे मु चिदानंदशास्त्री हिरेमठ व विद्यार्थी, पालक उपस्थित होते.