सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 विश्लेषण

बोपदेव घाटामध्ये शस्त्राचा धाक दाखवून मोबाईल फोन व पैसे लुटणा-या गुन्हेगारांना कोंढवा तपास पथकाने केले जेरबंद ; ५ चोरीचे गुन्हे केले उघड

डिजिटल पुणे    26-04-2024 18:59:16

पुणे : दि. २१/०४/२०२४ रोजी रात्रौ ०२:३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आशुतोष संजयकुमार राज, (वय २२ वर्षे), चंदा शिक्षण, रा. साईधाम अर्पाटमेंट, तीसरा मजला क्राऊन बेकरी समोर, त्रिमुर्ती चौक, पुणे हे त्यांच्या मित्र आयान श्रिवास्तव, अनिकेत कुमार, आनंद राज याचे सह बोपदेव घाट येथील टेबल पॉटवर, येवलेवाडी, कोंढवा बु., पुणे येथे गप्पा मारत बसलेले असताना त्यांच्या पाठीमागून दोन दुचाकी गाड्या आल्या तीन अनोळखी इसमांनी त्यांना शस्त्राचा धाक दाखवून तसेच हाताने मारहाण करून त्यांना ५ हजार रूपयांची मागणी केली असता फिर्यादी व त्यांच्या मित्रांकडे रोख पैसे नसल्याने जबरदस्तीने ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास भाग पाडुन त्यांच्या दुचाकी गाड्यांवरून पळुन गेले. त्याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरचा गुन्हा घडल्यानंतर कोंढवा तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक बालाजी डिगोळे व तपास पथकातील अंमलदार यांनी तपास सुरू करून नमुद गुन्ह्यातील आरोपीबाबत बातमीदारामार्फतीने माहिती काढत असताना दि.२१ रोजी पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे यांचे पथकातील पोअंम शाहिद शेख व लक्ष्मण होळकर यांना त्याच्या खास बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, दोन दिवसापुर्वी बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेलेल्या मुलांना लुबाडणे आरोपी हे पुन्हा लुबाडण्याच्या उद्देशाने बोपदेव घाटात आलेले आहे. तेव्हा सदर आरोपी यांना पकडण्यासाठी तपास पथकातील अंमलदार सतिश चव्हाण,  निलेश देसाई, विशाल मेमाणे,  गोरखनाथ चिनके, शाहिद शेख, लक्ष्मण होळकर,  संतोष बनसुडे,  सुजित मदन,  सुरज शुक्ला व असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो, कोंढवा पोस्टे पुणे शहर व पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे बोपदेव घाट येथे जावुन स्टाफच्या दोन टिम तयार करून आरोपी यांचा शोध घेत असताना बोपदेव घाटात अंधारामध्ये दोन दुचाकी गाड्या टेबल पॉइंटवर आलेल्या दिसून आल्या. 

 

सदर गाड्यांवरील तीन इसमांनी त्यांच्या दुचाकी गाड्या टेबल पॉइंटवर पार्क केल्या. त्यातील मोपेड गाडीवरील चालकाने गाडीचे डिकीतून हत्यारे बाहेर काढली व ती तीघांनी आपापल्या पँटमध्ये खोचून ठेवली. त्यानंतर ते टेबल पॉइंटवर आजु बाजुला टेहाळणी करीत फिरू लागले. सदर इसम हेच टेबल पॉइंवर जबरी चोरीचा प्रकार करीत असल्याचे आमचे लक्षात आले. पोलीस त्यांचे नजिक जात असताना त्यांना पोलीस आल्याचा संशय आल्याने ते पळत जाऊ लागले. पोलीस स्टाफने त्यांना घेरून पोलीस असल्याचे सांगितल्याने त्यांनी त्यांच्याकडील हत्यारे खाली जमिनीवर ठेवली. पोलीसांनी त्यांना हत्यारे घेवून सदर ठिकाणी येणाचे कारण विचारले असता त्यांनी सदर ठिकाणी बसलेल्या मुला मुलींना लुटण्याकरीता आल्याचे सांगितले. सदर इसमांना त्यांच्याकडील हत्यारांना व दुचाकी गाड्यांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे १) साहील अकबर बानेवाले, (वय २० वर्षे), रा. संगम हॉस्पीटल जवळ, सिटी सेंटर रोड, उंड्री, पुणे २) राहूल परवाराम गौतम, (वय २१ वर्षे), रा स.नं. ५३, काळे पडळ, गल्ली नं ५, हडपसर, पुणे व ३) गालीब बादशाह मेहबुब अत्तार, (वय १९ वर्षे), रा संगम हॉस्पीटल जवळ, सिटी सेंटर रोड, उंड्री, पुणे. असे असल्याचे सांगितले. सदर आरोपीतांचे पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान अद्याप पर्यंत एकुण ०२ दुचाकी गाड्या, दोन धारदार कोयते एक धारदार सुरा व ०३ मोबाईल फोन असा एकुण १,७२,२५०/- रू किं चा मुद्देमाल हस्तगत करून पुढीलप्रमाणे गुन्हे उघड करण्यात आले आहे. 

१) कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन. ३६८/२०२४ भादंवि कलम ३९४.

२) कोंढवा पोलीस ठाणे पुणे ४५०/२०२४ मादंवि कलम ३९४.

३) कोंढवा पोलीस ठाणे पुणे ४५३/२०२४ भा.दं.वि. कलम ३९२.

४) लोणी काळभोर पो.स्टे गु.र.नं २२४/२०२४ भा.दं.वि. कलम ३९२.

५) लोणी काळभोर पो.स्टे गु.र.नं २२५/२०२४ भा.दं.वि. कलम ३९२.

असे एकुण ०५ गुन्हे उघडकीस आनले आहेत.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती