सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

गोष्ट आमच्या लग्नाची; सौ वर्षा मिसाळ, यांनी सांगितली हिंदू-मुस्लिम अशा दोन धर्माच्या जोडप्याची शानदार कहाणी

डिजिटल पुणे    01-05-2024 11:43:47

माझे नाव मुमताज...  कश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यातील 'अचाबल' या छोट्याश्या निसर्गरम्य गावातील एका  खानदानी मुस्लिम घरातील 20-21 वर्षाची मी मुलगी 91 व  92 चा तो काळ फारच भीषण भयंकर होता. काश्मीरमध्ये जणू काय सर्वत्र होरपळ चालली होती आणि अशातच मी त्या रुबाबदार फौजी अधिकाऱ्याच्या प्रेमात पडले होते. झालं असं की......

त्यादिवशी ती सैनिकांची तुकडी झपाट्याने आमच्या घरात शिरली.  कोणा मुजिबूर नावाच्या आतंकवाद्याला शोधण्यासाठी त्यांनी आमच्या संपूर्ण वस्तीलाच घेरावा घातला होता. प्रत्येक घरात शिरून कसून शोध घेत होते. खरंतर भीतीने माझी गाळण उडाली होती. इतक्यात दोन-तीन सैनिकांनी अब्बूना बाजूला नेलं. कुणी एक जबाबदार तरुण अधिकारी एक फोटो दाखवत त्यांच्याशी बोलत होता. अब्बू मान हलवू नकार देत होते. थोड्यावेळाने सारे सैनिक निघून गेले. 

रात्री जेवण करताना अब्बुनी खुलासा केला. कॅप्टन 'नझीर'  ने दाखवलेला तो फोटो आमच्या नामदा (कश्मीरी गलीच्या) च्या दुकानात नेहमी येणाऱ्या एका गिर्‍हाईकाचा होता. अबूना त्या फोटोची ओळख दाखवून नसत्या डोकेदुखीला सामोर जायची नव्हते मीही बऱ्याच वेळा आमच्या दुकानात अब्बूच्या मदतीला जात असल्याने मीही त्या इसमाला अब्दुल ला ओळखत होते. अबुनी मदत करायला हवी होती असं त्यावेळी मला मनापासून वाटून गेलं. 

शांत, थंड वाटणारा, खालच्या पट्टीत बोलणारा अब्दुल त्या मुजिबूरच्या साथीदार असेल का? उगाचच माझ्या मनात प्रश्न डोकावला. का कोण जाणे पण रात्रभर आपण त्या कॅप्टन नझीरला ही गोष्ट सांगावी का हा प्रश्न माझ्या मनात तरळत राहिला.

पुढे दोन-तीन दिवसांनी मी आमच्या दुकानात गेले असताना अचानक कॅप्टन नझीर भेट झाली.  त्याने मला ओळखलं मीही त्याला गालीचाची निवड करायला मदत केली पावसाला सुरुवात झाली.  आणि अर्थातच त्याने मला आपल्या गाडीतून घरी सोडायची इच्छा व्यक्त केली. हळूहळू नझीरचे आमच्या घरी येणे जाणे वाढले.  एक दिवस मी धीर  करून त्याला अब्बूना दाखवलेल्या फोटोबद्दल विचारले.  त्याने मला फोटो दाखवल्यावर मीही त्याला हा माणूस नेहमी बाजारातील अनेकांकडून नामदा खरेदी करत असतो असे सांगितले.  (अर्थातच माझ्या घरी कोणालाही सांगू नका अशी विनंती केली.) 

अबूनाही आता कॅप्टन नझीरचा आदर्श वागणं स्वभाव आवडू लागला होता.  अर्थात माझं मनही त्याच्यात गुंतत चाललं होतं पण त्याला हे सांगायची माझी हिम्मतच होत नव्हती, पण माझ्या अबुनीच त्याच्याही नकळत माझी मदत केली.  त्यांनी एक दिवस त्याला जेवायला यायचे निमंत्रण दिले.  जेवण झाल्यावर अब्बूनी नि शादीचा विषय काढला.  या विषयावर थोडसं अवघडले पणानेच त्याने उत्तर दिले "अभी कश्मीर का पोस्टिंग खतम हो जाएगा तो शादी के बारेमे सोचेंगे अभी तो या का खतरा आपको तो पता ही है."

त्यावर अब्बू म्हणाले "बिलकुल ठीक बोल रहे हो.  अब मै सीधी बात करूँगा...  आप हमारी बेटी मुमताज को पसंद करते हो अगर आपका जवाब हां हे.  तो हमे कोई ऐतराज नही है."  अबू चे हे शब्द ऐकले आणि मी आनंदाने मोहरले त्याच्याकडे शादीचा प्रस्तावच मांडला होता.  पण त्याने लगेच काढता पाय घेतला. 

पुढे दोन-तीन वेळा अबू ने शादीचा विषय काढला पण प्रत्येक वेळी नझीर ने गुळ मुळीच उत्तर दिले.  अबू त्याच्या वागण्याने गोंधळात पडले होते, मी मात्र कदाचित मी त्याला पसंत नसेल या विचाराने उदास झाले, माझं पहिलं प्रेम पोकळ अपयशी ठरलं होतं.  काही दिवसांनी एक दिवस अचानकच तो वेळ ठरवून भेटायला आलो.  प्रथम त्याने आपलं पंजाब मधील पठाणकोट येथे पोस्टिंग आल्याचे सांगितलं आणि शादी साठी होकारही दर्शवला पण त्यानंतरचे त्याचे बोलणे ऐकून आमच्या घरात जणूकाही बॉम्बच येऊन पडला.

कॅप्टन नझीर चे खरे नाव निशिकांत होते आणि तो धर्माने हिंदू होता. कश्मीरमध्ये पोस्टिंग झाल्यावर सर्व फौजींना मुस्लिम नावे धारण करावी लागतात. मला एकावेळी दोन धक्के बसले होते.  मी त्याला आवडते हा आनंदाचा धक्का आणि तो हिंदू आहे.  हा अनुपेक्षित धक्का आणि प्रेमामध्ये इतकी ताकद असते.  ना त्या प्रेमाने हा अनपेक्षित धक्का सहज पचवला उलट माझे त्याच्यावरचे प्रेम आणखी घट्ट झाले, तो खोटे बोलला नव्हता फौजेशी एकनिष्ठ होता आणि त्याच्या प्रेमाला धर्म आड येत नव्हता. 

परंतु त्या दिवसानंतर आमच्या घरचे वातावरण बदलले.  चहूकडून माझ्यावर त्याला विसर असा दबाव येऊ लागला.  इतके दिवस नझीर हा किती गुणी मुलगा आहे, असे म्हणणारे अब्बू आता त्याला खोटारडा म्हणू लागले होते, नझीरने आपल्याला त्याच्या धर्माबद्दल सांगायला हवे होते, असे अबूचे म्हणणे होते.  आम्ही अब्जा विचाराशी सहमत होती अम्मी आणि अब्बू बरोबर माझे वाद होऊ लागले.  तुलाही हिंदूच्या सगळ्या प्रथा पाळाव्या लागतील.  सगळे सण पूजा उपवास करावे लागतील, तू मुस्लिम असल्यामुळे त्याच्या घराचे तुझ्या कायम तिरस्कार करतील, तुलाही आतंकवादी समजतील तुला त्यांच्या समारंभात ते सामील करून घेणार नाहीत, तू एकटी पडशील तो आपल्या आई-वडिलांचेच ऐकणार आणि तूच मला नादाला लावलं असं म्हणणार अम्मी अब्बू वाटेल, त्या कल्पना करून मला समजवायचा प्रयत्न केला.  पण त्यामुळे माझं निर्णय आणखी पक्का होत गेला पठाणकोटला जाण्याआधी कॅप्टनने निशिकांत एक दिवस घरी येऊन सर्व समक्ष माझ्याशी लग्न करशील का असे विचारले.  अर्थातच मी होकार दिला पण अब्बूनी मात्र कठोर निर्णय घेतला.  लग्नानंतर आम्ही तुझ्याशी रिश्ता ठेवणार नाही असं सांगितलं.

 त्यानंतर पुढे सहा महिने आमचा पत्रव्यवहार चालू होता.  निशिकांत त्याच्या घरीही माझ्याबद्दल सांगितलं होते.  त्याच्या घरच्यांनी विरोध दर्शवला निशिकांतने याल तर सह नाहीतर शिवाय' या उक्तीप्रमाणे हे लग्न होणारच असं त्याच्या आई-वडिलांना ठामपणे सांगितलं.  मंग निशिकांतने त्यांच्या युनिटच्या कमांडिंग ऑफिसर (co ) सारी परिस्थिती सांगितली.  आणि युनिटमध्ये लग्न करायची परवानगी मागितली.

ठरल्याप्रमाणे निशिकांतचा  मित्र कॅप्टन राहुल- मला न्यायला आमच्या घरी आला.  अम्मी अब्बू निरोप घेऊन एका नवीन अनोख्या आयुष्यात मी धाडसाने पाऊल टाकले.  आमचं लग्न हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय आनंदाचा क्षण होता.  आम्हा दोघांचे रक्ताच्या नात्याचे लोक हजर नसले तरी जिवाभावाचे जीवाला जीव देणारे युनिटचे सारे आमच्या सोबत होते.  कारण आमच्या युनिट मधील काही अधिकारी त्यांचे कुटुंबीय वर पक्षात आणि काही वधू पक्षात सामील झाले होते.  दुल्हन ला शादी का जोडा दागिने अशी लग्नाची सर्व खरेदी मी इतर अधिकाऱ्यांच्या पत्नी बरोबर बाजारात जाऊन केली. 

आता लग्नाच्या दिवशी युनिटच्या सर्व धर्मस्थळ युनिट मधील ती पवित्र जागा जिथे सर्व धर्मांची श्रद्धास्थान आणि एकाच हाताखाली विराजमान असतात.  मध्ये सारे जमले होते.  मोठा मांडव घातला होता.  हिंदू रिवाजाप्रमाणे अग्नीभोवती सात फेरे घेऊन आमचा विवाह संपन्न झाला.  पण नंतर जेव्हा मुस्लिम रिवाजाप्रमाणे आम्हाला मध्ये पडदा ला वेगळे बसवण्यात आले.  काजीने येऊन रीतसरपणे आपको ये निका कबूल है असे मला विचारल्यावर मला भावनावेग  आवरेना.   पाझरत्या  डोळ्यांनीच मी कबूल हे म्हटला आणि पडद्यापलीकडचा एकच जल्लोष झाला. 

निशिकांत मराठी असल्याने मीही मराठी शिकले.  लग्न झाल्यावर माझ्या सासरी नागपूरला गेल्यावर थोड्या नाराजीने सासू-सासर्‍यांनी आमचे स्वागत केले. घरच्यांनी परंपरा म्हणून मला साडी, बिलवर- फाटल्या आणि नथ भेट दिली. 

आमचा संसार सुरू झाला.  पुढे दीड दोन वर्षांनी 1996 साली मी एक मुलगा आणि एक मुलगी अशा जुळ्यांना जन्म दिला.  दोन घरच्या नात्यांमधील तेढ थोडीफार निवळली होती.  पण फक्त मुलांच्या विषयी चौकशी होत असे आमची युनिट हेच माझे माहेर होते त्याच लोकांचा मला खंबीर आधार होता. 

अशातच 1999 मध्ये कारगिलचे युद्ध सुरू झाले.  अर्थातच निशिकांत कारगिल कडे रवाना झाला.  आणि पुन्हा एकदा सर्व चित्र पालटले दोन्ही घरचे आजी आजोबा आळीपाळीने आमच्या घरी येऊन माझ्या मुलांचे सोबत राहू लागले.  सहवासाने मने जुळली अबू आणि निशिकांचे पप्पा यांची छान ओळख झाली.  कारगिल युद्ध संपले निशिकांत परत आला.  त्याला तेथील कामगिरीबद्दल शौर्य चक्र मिळाले एकाच वेळी आमच्या घरात दिवाळी आणि ईद साजरी झाली मी आनंदाने समाधानाने भरून पावले.

खरंच प्रेमामध्ये आणि प्रेमाने बांधलेल्या लग्नाच्या गाठी मध्ये किती ताकद असते ना आम्हा दोघांचे एकमेकांवरचे प्रेम आजी-आजोबांचे नातवंडावरचे प्रेम आणि एका फौजीचे देशावरचे प्रेम हे प्रेमाचे अनेक रंगी धागे सर्वांना उमजले तर खरंच वसुदेव कुटुंबकम ही उपटी प्रत्यक्षात उतरायला कोणालाही अडथळा येणार नाही..

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती