सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 विश्लेषण

सिद्धू मुसेवाला प्रकरणातील प्रमुख आरोपी गोल्डी ब्रार याची कॅलिफोर्नियामध्ये गोळ्या झाडून हत्या

डिजिटल पुणे    01-05-2024 16:51:55

कॅलिफोर्निया : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील मास्टरमाईंड आणि सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य गोल्डी ब्रार याला डल्ला लखबीर या त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीतील सदस्यांनी गोळ्या घालून ठार केले आहे. रिपोर्टनुसार, गोल्डी ब्रार यांची कॅलिफोर्नियामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

एका अमेरिकन वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, फेअरमाँट अँड होल्ट एव्हेन्यू येथे स्थानिक वेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी ५:२५ च्या सुमारास ही घटना घडली. गोल्डी ब्रार एका साथीदारासह त्यांच्या निवासस्थानाबाहेर उभा होता दरम्यान अज्ञात हल्लेखोर तेथे आले आणि त्यांनी गोळीवर गोळीबार केला. यावेळी त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले.

गोल्डी ब्रार याचा प्रतिस्पर्धी, गुंड अर्श डल्ला तथा लखभीर याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, या आरोपांबाबत लॉरेन्स बिश्नोई किंवा अन्य कोणत्याही गुंडाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

 कोण होता गोल्डी ब्रार? 

पंजाबमधील मुक्तसर साहिब येथे १९९४ मध्ये जन्मलेला गोल्डी ब्रार पोलीस पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आला होता. चांगले शिक्षण देऊन त्याला मोठे करण्याची कौटुंबिक आकांक्षा असताना गोल्डीने मात्र वेगळा मार्ग निवडला. सतविंदरजीत सिंग या नावानेहही त्याची ओळख होती, तो बीए पदवीधर होता तसेच कॅनडामध्ये स्थायिक होता व तेथून तो आपली सूत्रे हलवत होता.

गोल्डी ब्रारचा चुलत भाऊ गुरलाल ब्रार याची गेल्या वर्षी चंदीगडमधील नाईट क्लबबाहेर हत्या करण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी असलेल्या गुरलालला युवक काँग्रेसचे नेते गुरलाल पहलवान यांच्या हत्येचा बदला म्हणून बिश्नोईच्या टोळीने लक्ष्य केले होते. या घटनांनंतर गोल्डी २०२१ मध्ये कॅनडाला पळून गेल्याची माहिती आहे. तो सुरुवातीला २०१७ मध्ये स्टुडंट व्हिसावर कॅनडाला गेला होता.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती