सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 विश्लेषण

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवारांनी सभांचा लावला धडाका

डिजिटल पुणे    02-05-2024 15:30:37

इंदापुर : बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जंगी सभा होत आहेत. बारामती मतदारसंघातील प्रत्येक भागात सध्या अजित पवारांनी सभांचा धडाका लावला आहे. अशातच सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी अजित पवारांची इंदापुरमधील सणसर येथे जाहीर सभा पार पडली. या सभेला भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील आणि युवा महिला नेत्या अंकिता पाटील या देखील उपस्थित होत्या. यावेळी मोदींचे हात बळकट करण्यासाठी सुनेत्रा काकींना मतदान करा, असे आवाहन अंकिता पाटील यांनी उपस्थित मतदारांना केले. 

यावेळी अंकिता पाटील म्हणाल्या की, "येणाऱ्या सात तारखेला सर्वांना जास्तीत जास्त मतदान करून सुनेत्रा काकींना आपल्याला दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये पाठवायचं आहे. महायुतीच्या उमेदवार म्हणून आपण आज बारामती लोकसभेमध्ये काम करत असताना आपण जर पाहिलं तर मागच्या दहा वर्षांमध्ये ज्या विद्यमान खासदार होत्या.  त्या मोदीजींना विरोध करत होत्या. त्या आपल्या केंद्र सरकारला विरोध करत होत्या. केंद्र सरकारच्या सर्व योजना होत्या. त्याला त्या विरोध करत होत्या. त्याच्यामुळे कुठल्याच प्रकारचा विकास आपल्या भागामध्ये आज इथे झालेला नाही. असं म्हणत त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर देखील अप्रत्यक्षपणे टिका केली. 

तसेच आपल्या मतदारसंघात कसल्याच प्रकारचा निधी त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला नाही. त्यामुळे आपल्याला मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या सात तारखेला जास्तीत जास्त मतदान करून सुनेत्रा काकींना आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचं आहे.  आज केंद्र शासनाच्या भरपूर योजना आहेत. त्याच्यामध्ये जलजीवन मिशन असेल. असे अनेक विकासकामांचे विषय आहेत. आज मोदीजींच्या माध्यमातून आपल्याला मुद्रा योजना असेल. त्याचप्रमाणे अठरा वर्षाच्या ज्या मुली जन्माला येतात. त्या आज आपल्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत.  त्याच्यामुळे आपल्या घरात जन्म घेणारी मुलगी ही मुलगी आपली लखपती कशी होईल.  याबाबतीत आपल्या शासनाने चांगले प्रयत्न केलेले आहेत.

आज महायुती म्हणून आपण सर्वजण एकत्रित काम करत आहोत. आज महायुती म्हणून आपण मोदीजींना बघून आपल्याला येणाऱ्या सात तारखेला मतदान करायचं आहे.  मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला मतदान करायचा आहे.  आपल्याला प्रवाहाच्या विरोधात असणाऱ्या खासदारांना निवडून द्यायचा ही काय विषय आपल्यासमोर नाही आहे.  कारण आपण जर मोदीजींच्या विचाराचा जर आपण उमेदवार निवडून दिला.  तर आपल्याला जास्तीत जास्त फायदा येणाऱ्या पाच वर्षांमध्ये होणार आहे.  जास्तीत जास्त निधी आपल्याला येणाऱ्या पाच वर्षांमध्ये होणार आहे.  आपल्या पूर्ण भागाचा विकास आहे, तो आपल्याला करायचा असेल तर येणाऱ्या आपल्या सात तारखेला आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला सुमित्रा वहिनींना मतदान करून त्यांना आपल्याला निवडून द्यायचा आहे. असेही त्या म्हणाल्या.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती