सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 शहर

दि.४ मे रोजी 'आनंद तरंग' कार्यक्रम; भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम

डिजिटल पुणे    03-05-2024 10:33:13

पुणे;  भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ' आनंद तरंग ' या गाण्यांच्या  कार्यक्रमाचे आयोजन दि. मे  २०२४ रोजी   करण्यात आले आहे.'स्वरगंध,पुणे'प्रस्तुत या कार्यक्रमात डॉ.नीलिमा राडकर या व्हायोलिनमधून आणि माधवी करंदीकर या हार्मोनियममधून शास्त्रीय संगीतावर आधारित सुप्रसिद्ध चित्रपटगीते , भावगीते सहवादनातून सादर करतील.रवींद्र क्षीरसागर,जितेंद्र पावगी(तबला),नरेंद्र काळे (तालवाद्य) हे साथसंगत करणार आहेत. यशश्री पुणेकर या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. 
 
हा कार्यक्रम शनिवार, दि. मे    २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच  वाजता  भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे  होणार आहे.हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २० वा कार्यक्रम  आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे  ही माहिती दिली.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती