सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 व्यक्ती विशेष

शरद पवार यांचे सर्व दौरे रद्द, प्रकृती बिघडली

डिजिटल पुणे    06-05-2024 11:25:09

पुणे : प्रकृती अस्वस्थतेमुळे शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. देशभरात होत असलेल्या लोकसभेच्या तिसर्‍या टप्प्याचे मतदान ७ मे रोजी होत आहे. या टप्प्यातील प्रचार थांबला आहे.तिसर्‍या टप्प्यात राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघ देखील आहे. यंदा प्रथमच सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत आहे. यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघासह राज्यातील अनेक भागात दौरे आणि सभांचा धडका लावला. त्याच दरम्यान काल बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचाराचा अखेरचा दिवस होता. त्या निमित्ताने आज दुपारी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला पवार कुटुंबातील सर्व सदस्यांसह नागरिकदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 गेल्या काही दिवसांपासून शरद पवार महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांसाठी राज्यभर सभा, रोड शो, कोपरा सभा, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्यामुळे त्यांनी उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहे.तसेच,कात्रज येथे होणारी नियोजित सभा आणि इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले असून याची सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिकांनी नोंद घ्यावी असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी(शरदचंद्र पवार गट) यांच्यातर्फेजाहीर सूचना करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी(शरदचंद्र पवार गट) पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना पुढील नियोजित सभांविषयी अधिक माहिती लवकरच कळविण्यात येईल, असे सूचित करण्यात आले आहे.

 

 

 

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती