सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 व्यक्ती विशेष

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये मतदान केल्यानंतर पुन्हा एकदा शरद पवारांवर साधला निशाणा!

डिजिटल पुणे    07-05-2024 15:13:03

बारामती : महाराष्ट्रात अत्यंत चुरशीची होत असलेल्या बारामतीच्या लढतीसाठी आज मतदान पार पडत आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासह अजित पवारांनी आज मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी देखील शरद पवारांसह मतदानाचा हक्क बजावला. यातच आता सुप्रिया सुळे यांची सांगता सभा झाली होती. त्या सभेत शरद पवार यांचा घसा बसला होता. त्यानंतर त्यांनी एक दिवस सगळेच कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यावर आता अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. 

अजित पवार म्हणाले की, आताच्या काळात सर्वांनी सांगायला पाहिजे होतं की अशा पद्धतीने दगदग करू नका. तुम्ही आराम करा. आम्ही निवडणुकीची जबाबदारी उचलू. जयंत पाटील, अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया स्व : आता जे साहेबांजवळ आहे. त्यांनी ही जबाबदारी पार पाडायला पाहिजे होती. मी जर त्यांच्याबरोबर असतो तर मी सांगितलं असतं की, २००४ ला असाच प्रसंग आला, तेव्हा आम्ही ती जबाबदारी पार पडली. तेव्हा बऱ्यापैकी जागा आपण निवडून आणल्या होत्या.

सुप्रिया सुळेंच्या शेवटच्या सभेत सर्व कुटुंब एकत्र आलं होतं. पण यात मला राजकीय महत्वांकांक्षा दिसत नाही. कारण जो काम करतो त्यालाच जनता निवडून देत असते. कुटुंब-कुटुंब करता, पण माझं कुटुंब एवढं मोठं आहे की तीन परिवार सोडून ( श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार, आणि शरद पवार यांचे परिवार )  प्रचारात कोणी नव्हतं. आमच्याकडूनही काही प्रचार करत होते. सुनेत्रा उमेदवार म्हणून बसली होती, मी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अध्यक्ष म्हणून भाषण करत होतो.असेही ते म्हणाले. 

 दरम्यान, “सुप्रिया आणि रोहित पवार साहेबांना सारखं बोलावतात. बाकी कोणाचं काही चालत नाही. मी आजही कुटुंबातील सदस्य आहे. परंतु, तेव्हा मी या सर्व गोष्टी पाहायचो. तेव्हा आर.आर पाटील, छगन भुजबळ मिळून सर्व गोष्टी ठरवायचो. कुटुंब म्हणून काम करायचो. आताच्या काळात एवढा त्रास होत होता, त्यांना बोलताना त्रास होत होता. त्यावेळी त्यांनी सांगायला हवं होतं. सुप्रियाही ५४ वर्षांची आहे. जयंत पाटील, अमोल कोल्हे, अनिल देशमुख यांसारख्या वरिष्ठ नेत्यांनी सांगायला हवं होतं.” असेही त्यांनी सांगितले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती