सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

पुण्यातील सांगवी गावचा सुमित ठरला जगात पहिला

डिजिटल पुणे    13-03-2024 10:27:12

आंतरराष्ट्रीय: कजाकिस्तान येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय मार्शल-कुस्ती विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेत पैलवान सुमित अरविंद भोसले यांनी भारताला  सुवर्ण पदकाची कमाई करून दिली आहे,त्याने या स्पर्धेत उझबेकिस्थान, कोरिया युरेन या इतर देशातील खेळाडूंना पराभूत करत भारतासाठी अंतिम सामन्यात सुवर्ण कामगिरी करत,गोल्ड मेडल मिळवून दिले,अंतिम लढतीत 3-7 या फरकाने करेलपांगिस्थान देशाच्या खेळाडूला पराभूत करत, तसेच युक्रेंच्या मल्ला सोबत 4-9 व उझबेकिस्थान व कोरिया या देशातील मला वरती एकतर्फी मात केली,

सुमित यांनी  या संपूर्ण यशाचे श्रेय राजमाता जिजाऊ आईसाहेब छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांना तसेच पिंपरी चिंचवड व सांगली गावाला समर्पित केले आहे,सदर स्पर्धेकरिता त्यांना वस्ताद ताराचंद कालपुरे, भारत केसरी विजय  गावडे, मुंबई महापौर केसरी देवेंद्र पवार, पुणे केसरी समीर कोळेकर, आशियाई सुवर्णपदक विजेते अमोल साठे तसेच सोमाटणे केसरी लक्ष्मण जाधव आणि त्याचा मित्र मारुती वर्पे यांच्या मार्गदर्शनाने आणि अमूल्य साथीने या यशाला मिळवणे शक्य झाले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती