सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

क्रिकेट विश्वातुन मोठी बातमी : IPL सुरु असताना वेळापत्रक बदललं; कारण आणि वाचा लेटेस्ट अपडेट

पुजा    02-04-2024 17:37:52

नवी दिल्ली : आयपीएलचा १७व्या हंगामात १४ लढती झाल्या असून प्रत्येक लढती चुरशीच्या होत आहेत. स्पर्धेतील १० संघांनी जवळ जवळ प्रत्येकी ३ लढती खेळल्या आहेत. अशाच बीसीसीआयने आयपीएल २०२४च्या वेळापत्रकात बदल केल्याची घोषणा केली आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या साखळी फेरीतील फक्त दोन लढतींच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. या बदलाचे कारण या महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुका असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. निवडणुकीमुळे सुरक्षा व्यवस्थेचा विचार करता दोन लढतींच्या तारखा पुढे मागे करण्यात आल्या आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना १६ एप्रिल रोजी कोलकाता येथे ईडन गार्डन मैदानावर  होणार आहे. याआधी हा सामना १७ एप्रिल रोजी होणार होता. तर १६ एप्रिल रोजी होणारा गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामना १७ एप्रिल रोजी होणार आहे. गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. 

७ एप्रिल रोजी देशभरात रामनवमी उत्साहात साजरी केली जाणार आहे. आशा स्थितीमध्ये सुरक्षा पुरवणं शक्य होणार नाही. पश्चिम बंगाल क्रिकेट असोशिएशनसोबत याबाबत बीसीसीआयचं बोलणेही झाल्याचं समजतेय. त्यामुळेच कोलकात्याचा १७ एप्रिल रोजी होणारा सामना आता १६ एप्रिल रोजी होणार आहे. तर १६ एप्रिल रोजी होणारा गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामना १७ एप्रिल रोजी पार पडणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सामन्याचा दिवस बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 

सध्या गुणतक्त्यात आयपीएलमध्ये सोमवारी झालेल्या लढतीनंतर राजस्थान रॉयल्स संघ सलग ३ विजयासह अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ असून त्यांनी २ पैकी २ लढतीत विजय मिळवला आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असून या दोघांनी ३ पैकी २ लढतीत विजय मिळवला आहे. त्यानंतर प्रत्येकी दोन गुणांसह हैदराबाद पाचव्या, लखनौ सहाव्या, दिल्ली सातव्या, पंजाब आठव्या, बेंगळुरू नवव्या स्थानावर आहेत. या सर्वांनी प्रत्येकी एक विजय मिळवला आहे. तर सर्वात तळाला मुंबई इंडियन्सचा संघ असून त्यांनी ३ पैकी ३ लढती गमावल्या आहेत.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती