सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 राज्य

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी सरकारने वाढवली अर्ज करण्याची मुदत, ‘ही’ आहे शेवटची तारीख

डिजिटल पुणे    27-03-2024 14:09:23

नवी दिल्ली : महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे या भरतीचा अर्ज करण्यासाठी आता सरकारकडून मुदतवाढ होणार आहे. राज्य सरकारने याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. याआधी पोलीस भरतीचे अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च होती. परंतु आता ही अर्ज भरण्याची तारीख वाढवून १५ एप्रिल ही करण्यात आलेली आहे. मराठा आरक्षणासाठी लागणारे ईबीसी प्रमाणपत्र मिळण्यास आता उशीर होत असल्याने सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.मराठी नागरिकांना तांत्रिक अडचणीमुळे प्रमाणपत्र मिळण्यास उशीर झाला असल्याने उमेदवारांचा प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्जाची पोस्ट पावतीसह आवेदन अर्ज सादर करावा. लागतो. मात्र कागदपत्राची पडताळणी वेळी त्यांचे विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्या अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत.

पोलीस भरतीसाठी शैक्षणिक अहर्ता 

विभागीय मंडळातून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा बारावी पास किंवा शासनाने या परीक्षेत समक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पोलीस भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

दहावी बारावीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र, जन्म दाखला, रहिवासी, प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, एमएससीआयटी पास असल्याचे प्रमाणपत्र, खेळाडू प्रमाणपत्र, नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र, माजी सैनिकांसाठी, डिस्चार्ज प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र, पोलीस पाल्य प्रमाणपत्र, अनाथा बाबतचे प्रमाणपत्र, अंशकालीन प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र,एनसीसी प्रमाणपत्र.पोलीस भरती करण्यासाठी तुम्हाला या सगळ्या कागदांची पूर्तता करावी लागणार आहे. या कागदांची पूर्तता करण्यासाठी बऱ्याच वेळ लागणार आहे. त्यामुळेच आता सरकारने १५ एप्रिलपर्यंत पोलीस भरतीची मुदत वाढ करून दिलेली आहे. त्यामुळे राज्यातील खालील ठिकाणी भरती होणार आहे.

बृहन्मुंबई आयुक्तालय

ठाणे आयुक्तालय

पिंपरी-चिंचवड आयुक्तालय

मिरा-भाईंदर आयुक्तालय

नागपूर आयुक्तालय

नाशिक आयुक्तालय

नवी मुंबई आयुक्तालय

अमरावती आयुक्तालय

सोलापूर आयुक्तालय

छ. संभाजीनगर आयुक्तालय

लोहमार्ग-मुंबई आयुक्तालय

ठाणे ग्रामीण जिल्हा

रायगड जिल्हा

पालघर जिल्हा

सिंधुदूर्ग जिल्हा

रत्नागिरी जिल्हा

नाशिक ग्रामीण जिल्हा

अहमदनगर जिल्हा

जळगांव जिल्हा

धुळे जिल्हा

नंदुरबार जिल्हा

कोल्हापूर जिल्हा

पुणे ग्रा. जिल्हा

सातारा जिल्हा

सांगली जिल्हा

सोलापूर ग्रा. जिल्हा

छ. संभाजीनगर ग्रा. जिल्हा

जालना जिल्हा

बीड जिल्हा

धाराशिव जिल्हा

नांदेड जिल्हा

लातूर जिल्हा

परभणी जिल्हा

चंद्रपूर जिल्हा

नागपूर ग्रा. जिल्हा

भंडारा जिल्हा

वर्धा जिल्हा

गडचिरोली जिल्हा

गोंदिया जिल्हा

अमरावती ग्रा. जिल्हा

अकोला जिल्हा

वाशिम जिल्हा

बुलढाणा जिल्हा

यवतमाळ जिल्हा

लोहमार्ग-पुणे जिल्हा

लोहमार्ग औरंगाबाद जिल्हा


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती