सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 राज्य

'उपोषण सोडलं असलं तरी लढा सुरूच राहणार' ; सोनम वांगचुक यांनी अखेर २१ दिवसानंतर सोडलं उपोषण

पुजा    27-03-2024 18:34:36

लेह : केंद्रशासित लडाखला राज्याचा दर्जा दिला जावा आणि हिमालयातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पाऊले उचलावीत, या मागण्यांसाठी प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचूक यांनी सुरू केलेले आपले उपोषण आज २१ दिवसांनंतर सोडले. उपोषण सोडले असले तरी लढा सुरूच राहिल, असे वांगचूक यांनी स्पष्ट केले. 

सोनम वांगचूक यांनी ६ मार्च रोजी या उपोषणाला सुरुवात केली होती. त्याचवेळी हे उपोषण २१ दिवस चालणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. परंतु, त्यानंतरही त्यांचा लढा सुरूच राहणार आहे. याबाबत त्यांनी एक्स पोस्टमध्य म्हटलंय की, मी उपोषण संपवले तेव्हा सात हजार लोक जमले होते. मी परत येईन. आज ७,००० लोक जमले. माझ्या उपोषणाचा पहिला टप्पा संपला. तसेच, २१ दिवस गांधीजींनी ठेवलेले सर्वात मोठे उपोषण होते.” पोस्टसोबत त्यांनी एक व्हीडिओ शेअर केला असून त्यात ते हिंदीत म्हणाले, “आज एक महत्त्वाचा दिवस आहे. पहिला टप्पा संपला आहे, पण उपोषण संपले नाही. उद्यापासून पुढील दहा दिवस महिलांचा समूह उपोषण करेल. त्यानंतर, तरुण मंडळी, मठातील भिक्षू मग पुन्हा मी अशा पद्धतीने उपोषणाची साखळी सुरू राहील. पण मला आशा आहे की साखळी उपोषण सुरू ठेवण्याची वेळ येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गहृमंत्री अमित शाह यांच्यात लवकरच जबाबदार नेतृत्त्वाची भावना जागृत होईल.” 

पुढे ते म्हणाले, मला आशा आहे की आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचेल. गेल्या काही आठवड्यांमध्ये ६० ते ७० हजार लोक इथे येऊन गेले. सरकार जनतेचा आवाज ऐकेल आणि दिलेली आश्वासने पूर्ण करेल. या २१ दिवसांत त्यांनी केवळ मीठ आणि पाण्याचे सेवन केले. उपोषण सोडताना लडाखमधील हजारो नागरिक उपोषणस्थळी जमले होते. वांगचूक यांचा लढा आम्ही पुढे सुरू ठेवू, असा निर्धार यावेळी महिलांनी व्यक्त केला. वांगचूक हे शिक्षणतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असून ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील ‘रँचो’ हे पात्र त्यांच्या आयुष्यावरच प्रेरित आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती