सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 शहर

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणावर कार्यशाळेचे आयोजन

MSK    22-04-2024 17:32:35

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात शुक्रवार दिनांक २६ मार्च ०२४  रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ च्या गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमाच्या सौजन्याने वाणिज्य विभाग व संशोधन केंद्र अण्णासाहेब मगर महाविद्यालय मार्फत एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यशाळेचा विषय हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नेविगेटिंग दि एन.ई.पी  वर्कशॉप ऑफ एज्युकेटर्स हा आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची दिशा व मार्गदर्शन तत्त्वे याबाबत कार्यशाळेचे आयोजन  करण्यात आलेले आहे. सदर कार्यशाळेच्या उद्घाटनासाठी उद्घाटक म्हणून डॉ.पराग काळकर (उप कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)आणि ऍडव्होकेट मोहनराव देशमुख (खजिनदार पुणे जिल्हा शिक्षण मंडळ) यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. तसेच डॉ. ए. बी. राव (सदस्य सुकाणू समिती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महाराष्ट्र राज्य) डॉ. यशोधन मिटारे (अधिष्ठता वाणिज्य आणि व्यवस्थापन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) आणि डॉ. प्रशांत साठे (बीएमसीसी कॉलेज पुणे) आदी मान्यवरांना  आमंत्रित करण्यात आले आहे.

सदर कार्यशाळा ही एक दिवसी असून यामध्ये चार सत्रे होणार आहेत तसेच पॅनल डिस्कशन मध्ये डॉ. अन्वर शेख, डॉ. एस. डी. टाकळकर, डॉ. एम. के. सानप, डॉ. के .एस. निकम, डॉ. एस. पी. डाकले, इत्यादी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांना आमंत्रित करण्यात आलेले आहे.  कार्यशाळेच्या समारोपासाठी प्रा. डॉ. प्रशांत मगर . महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे  यांनी  वाणिज्य विभागातील प्राध्यापकांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन केले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती