सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 शहर

पुण्यात मुकुंदनगर येथील केशव व्यंकटेश चाफेकर क्रीडागृहात आग

पुजा    23-04-2024 14:30:10

पुणे :  मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे केशव व्यंकटेश चाफेकर क्रीडागृहात आग लागली होती. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पंधरा मिनिटांत आग आटोक्यात आणली. केशव व्यंकटेश चाफेकर क्रीडागृहात खेळाचे साहित्य ठेवलेल्या ठिकाणी आग लागली होती. धूर मोठ्या प्रमाणात झाला. जवानांनी तातडीने आगीवर पाण्याचा मारा सुरू करत आग सुमारे पंधरा मिनिटांत आटोक्यात आणली. 

दरम्यान, खेळाडू आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधत सर्वजण सुरक्षित असल्याची खात्री केली. यावेळी उपस्थित खेळाडू, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे आभार मानले. परंतु आगीत गाद्या, फोम, इलेक्ट्रिक वायर, संगणक, सीसीटीव्ही आणि कार्यालयातील अन्य वस्तूंचे नुकसान झाले. जिमनास्टिकचे साहित्य जळाले होते. आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता असून या घटनेत कोणी जखमी झाले नाही.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती