सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 शहर

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आयोजित प्लास्टिक संकलन अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

डिजिटल पुणे    24-04-2024 16:02:30

पुणे : जागतिक वसुंधरा दिनानिमित्त सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या भारतामध्ये कार्यरत युनिसेफ अंतर्गत पर्यावरण संवर्धन व जनजागृतीसाठी स्थापन ग्रीन क्लबच्या वतीने आयोजित प्लास्टिक संकलन अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, उपप्राचार्य प्रा. डॉ. संगीता जगताप, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पती शास्त्र अभ्यास मंडळ सदस्या प्रा. डॉ. चंदा हासे, युनिसेफच्या ग्रीन क्लब व प्लास्टिक संकलन अभियान समन्वयक डॉ. राणी भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
 
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी आयोजित या अभियानामध्ये सहभागी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक करत लोकनेते  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार साहेब यांच्या पर्यावरण विषयक विचार व कार्यातून आदर्श घेत महाविद्यालय पर्यावरण संवर्धनासाठी नेहमी कटीबद्ध असल्याचे नमूद केले.
 
सदर प्लास्टिक संकलन अभियानामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी घरांमधील दुधाच्या पिशव्या, प्लास्टिक बॅाटल्स, प्लास्टिक आवरण व इतर प्लास्टिक टाकाऊ पदार्थ असा एकूण ८५ किलो प्लास्टिक जमा करुन पुढील प्रक्रियेसाठी तो सागरमित्र आभियान, पुणे या पर्यावरणवादी स्वंयसेवी संस्थेकडे जमा करण्यात आला. याकरिता कमिन्स ग्रुप, इंडिया यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबवत असल्याबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मा. राजेंद्रजी घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम.पवार, सहसचिव ए.एम.जाधव यांनी बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे विशेष अभिनंदन केले आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. सतीश एकार, डॉ. प्रवीण चोळके, डॉ. शिवाजी शेळके, प्रा. नीलम खोमणे, प्रा. वनिता शिंदे, रामदास चिंचवडे, सुनिल डोळस, राजेश लांडगे, अवधेश यादव यांच्यासह ग्रीन क्लबच्या सर्व सदस्य विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती