सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 व्यक्ती विशेष

बारामतीमध्ये रामदास आठवले यांनी शेरोशायरी करत सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ गाजवली सभा ; सुनेत्रा वहिनींच होणार लोकसभेवर सवार...

पुजा    26-04-2024 11:39:25

पुणे :  महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची बारामती लोकसभा मतदारसंघातील सासवड, बारामती, इंदापूर, दौंड याठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बारामतीमध्ये शेरोशायरी आठवले यांनी सभा गाजवली. ते म्हणाले ही लढाई आहे पवार विरुद्ध पवार.. पण आमच्या वहिनींच होणार आहे लोकसभेवर सवार.. आता बारामतीची जनता राहिली नाही गवार.. म्हणूनच बारामतीचा किल्ला सर करणार आहेत अजित पवार..बरेच वर्ष शरद पवार यांचा मी होतो साथी.. पण आता मी आहे अजितदादांचा साथी.. त्यामुळेच मी आलो आहे सुनेत्रा वहिनींना निवडून देण्यासाठी बारामतीत.. नरेंद्र मोदी यांनी वाढवली आहे देशामध्ये विकासाची गती म्हणूनच बारामतीत विजय होणार आहे आपली महायुती. 

महाविकास आघाडीकडून संविधान बदलणार असल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केले आहे की, संविधान बदलण्याची ताकद कोणामध्येही नाही. संविधान बदलण्याचा विषय अजिबात नाही. संविधान इतके पवित्र आहे की, त्याला कोणीही हात लावू शकत नाही. विरोधकांकडे दुसरा कोणताही मुद्दा नसल्यामुळे तसेच दलित आणि अल्पसंख्या मध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी इंडिया आघाडीकडून आणि महाविकास आघाडीकडून संविधान आणि लोकशाही धोक्यात असल्याचा अपप्रचार केला जात आहे. यावर लोकांनी विश्वास ठेवू नये, असेही आठवले म्हणाले. 

रामदास आठवले म्हणाले की, मी काही वर्ष काँग्रेस पक्षासोबत राहिलो. शरद पवार यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री बनण्याची संधी मिळाली. त्यावेळी शरद पवारांमुळे मिळाली होती मंत्री पदाची संधी आज मात्र या देशात आलेली आहे नरेंद्र मोदी यांची आंधी, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाच्या दिशेने भरधाव वेगाने चाललेले एक मोठे घोडे स्वार आहेत. त्यांचा हा घोडा थांबविण्यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत. मात्र नरेंद्र मोदींचा घोडा अडवण्याची ताकद त्यांच्यात नाही, असं म्हणत आठवले यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

इंदिरा गांधींच्या काळात गरिबी हटावचा नारा देण्यात आला. मात्र गरिबी हटवण्यात त्यांना यश आले नाही. ६०,७० वर्ष सत्तेत राहिलेल्या काँग्रेस पक्षाला ते जमले नाही. भ्रष्टाचार करत करत काँग्रेस पार्टी पुढे जात होती, अशी टीका आठवले यांनी केली. २००९ मध्ये मला काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाने मुद्दाम हरवलं. मी हरल्यानंतर माझ्या दिल्लीच्या बंगल्यातील सामान बाहेर काढलं. त्यात बुद्धांच्या मूर्ती, पुस्तके, कपडे होते. याआधी कधी असा प्रकार घडला नसेल. म्हणून मी प्रतिज्ञा केली होती की, काँग्रेसला सत्तेवरून बाहेर काढल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. या प्रकाराने माझा, माझ्या समाजाचा अपमान करण्यात आला, असंही आठवले म्हणाले. तसेच त्याने यावेळी पवार विरुद्ध पवार या संघर्षामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हिट होतील. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या चांगल्या मताने निवडून येतील, असा विश्वास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती