सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 व्यक्ती विशेष

पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर निशाणा ; 'जे अजित पवार दिसत आहेत ते अजित पवार नाहीच'

पुजा    26-04-2024 14:43:40

पुणे : लोकसभा निवडणुकांची तयारी राज्यासह देशात जोरदार सुरू झाली आहे. आज दुसऱ्या टप्यातील मतदान हे १३ राज्यातील ८९ लोकसभा मतदारसंघात होत आहे. यात महाराष्ट्रातील आठ जागांचा समावेश आहे. राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्या मतदानपेटीत बंद होत आहे. दुसरीकडे अजून प्रचारासाठी काहीच दिवस उरलेले असलेल्या बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात सभा, पदयात्रा होत आहे. या मतदारसंघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे. आज पुण्यातील खडकवासला मतदारसंघात येण्याऱ्या काही परिसरात सुप्रिया सुळें प्रचार करत आहेत. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. त्या म्हणाल्या, अजित पवारांकडे  राज्य कणखर नेता आणि विरोधी पक्षनेता म्हणून पाहत होतं. आता जे अजित पवार दिसत आहेत ते अजित पवार नाहीत. आताच्या अजित पवारांचे भाषणं ऐकले की आश्चर्य वाटतं अशी टीका त्यांनी यावेळी केली. 

महायुतीच्या सगळ्या नेत्यांना मिळून पवार साहेबांना संपवायचा आहे. चंद्रकांत पाटील बारामतीत आले होते. त्यावेळी त्यांनी हे बोलून दाखवलं होतं.  हे सगळं पवार साहेबांना संपवण्यासाठी षडयंत्र सुरु आहे.  महायुतीकजून जी कृती केली जात आहे. त्याने शरद पवारांना त्रास द्यायचा आहे, हे सिद्ध होत आहे. शरद पवारांना संपवायचं आहे. हाच अजेंडा घेऊन विरोधक कामाला लागले आहे, असा हल्लाबोल सुप्रिया सुळेंनी शरद पवारांवर केला आहे. 

 माझ्या बायकोला निवडून द्या सगळी काम करतो, अशी विधानं अजित पवार सातत्यानं करताना दिसत आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  त्या म्हणाल्या, कदाचित बहिणीच प्रेम कमी पडल असेल. दुर्दैव आहे की सगळेच नात्यांमध्ये अडकले आहेत. मी पहिला देश मग राज्य मग पक्ष मग नाती. मी नात्यांसाठी राजकारणात आले नाही तर मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आहे. दादा असं बोलतात याचा मला आश्चर्य वाटतं. आमच्याशी घटस्फोट होऊन सात महिने झाले. अठरा वर्ष एका संघटनेत आम्ही काम केलं आहे. 

आपल्या मतदारसंघासंदर्भात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझ्या मतदारसंघात नागरिकांशी माझा सतत संवाद असतो. त्यामुळे त्यांच्या अडचणी मला माहिती आहे. मी कायम वारजेमध्ये येते. जेव्हा पासून खासदार आहे. तेव्हापासून प्रत्येक मतदारसंघात मी दौरे करते. पुण्यासह राज्यात सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पुणे पालिकेच्या निष्क्रिय कामामुळे पुण्यातील पाणी, कचरा, ट्रॅफिक प्रश्न सुटले नाही. भाजपची एक हाती सत्ता असूनही काम नाही, हे त्यांचं अपयश आहे. पाण्याची परिस्थिती सगळेच भोगत आहेत.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती