सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 विश्लेषण

खडकवासला मतदारसंघाची खिंड लढवण्याची जबाबदारी आता पार्थ पवारांच्या हाती; सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी पार्थ पवार सक्रिय

डिजिटल पुणे    21-04-2024 15:33:11

पुणे :-  बारामती मतदारसंघातील पाच विधानसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना मताधिक्य मिळणार, मात्र भाजपच्या ताब्यात असलेल्या खडकवासला मतदारसंघातून मतदान होणार की नाही ? याची धास्ती अजित पवार यांना आली आहे. त्यामुळे खडकवासल्याची खिंड आता पार्थ पवारांच्या हाती देण्यात आली आहे. मागील काही दिवसापासून पार्थ पवार खडकवासल्यात ठाम मांडून बसले आहे.  विरोधात असलेल्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी गेल्या एक वर्षापासून याठिकाणी तयारी केली आहे. त्यामुळे आईसाठी मुलगा पार्थ पवार गेल्या काही दिवसापासून चांगलाच कामाला लागला आहे. 

बारामती लोकसभा मतदारसंघापैकी खडकवासला मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा राहिला आहे. भाजपच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघातून जो उमेदवार लीड घेतो तो विजयी होतो. असा इतिहास राहिला आहे. याच मतदारसंघात साडेपाच लाख मतदार असून मिळणार लीड उमेदवाराला फायद्याचं ठरलं आहे. महायुतीत असुनही भाजपने याठिकाणी अजून निवडणुकीच्या कामाला सुरुवात केली नाही, म्हणून अजित पवारांनी पार्थ पवारांकडे याची जबाबदारी सोपवली आहे. मागील काही दिवसापासून पार्थ पवार सक्रिय झाले असून  त्यांनी नऱ्हे, वारजे, कोथरूड, कोंढवे, धायरी, उत्तम नगर सिंहगड रस्त्याचा काही भाग, वडगाव, नांदेड सिटी, या भागात फिरत आहेत. 

खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेची मोठी ताकद राहिली 2014 भाजप सोबत माहितीतून कप बशीवर लढलेल्या महादेव जानकर यांना चांगले मताधिक्य मिळाले होते. तर 2019 मध्ये भाजपच्या त्या वेळेच्या उमेदवार कांचन कुल यांनाही या मतदार संघातून लीड मिळालं होतं. यावर्षी आता महायुतीमधून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  यातच आता सुनेत्रा पवार यांना देखील खडकवासला मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात लीड मिळावं, यासाठी पार्थ पवार आणि त्यासोबत भाजपचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. 

दरम्यान,  मागील लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर खडकवासला मतदारसंघातील मतदारांपर्यंत कोणताही उमेदवार पोहोचला नव्हता.  त्यामुळे जे काही मतदान झाले ते फक्त नरेंद्र मोदी यांच्या नावाने झाले असल्याचे बोलले जात आहे. मात्र खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन्ही बाजूंकडून सध्या प्रचार यंत्रणा जोरदार कामाला लागली आहे.  त्यामुळे या निवडणुकीत फक्त नरेंद्र मोदी तसेच भाजपच्या नावावरती मतदान थोडेसे अवघड आहे. यातच आता अजित पवार सहभागी झाल्याने त्यांना भाजप देखील मोठी ताकद मिळण्याची शक्यता आहे.

 दरम्यान, राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाला आपलं निवडणूक चिन्ह मतदारपर्यंत पोहोचवणं महत्त्वाचे ठरणार आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाला मतदान म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान हे देखील मतदारांना ठासून सांगावे लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांना त्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती निवडणूक लढत आहेत. त्यांना देखील हे चिन्ह प्रत्येकापर्यंत पोहोचवणं महत्त्वाचे ठरणार आहे. यातच अजित पवार यांच्याकडून आता खडकवासला मतदारसंघाचा विढा पार्थ पवारांनी उचलला असून हे अहवाल का हे पहावे लागणार आहे. ?


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती