सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • 'फेकनाथ मिंधे उत्तर द्यायला घाबरतात', आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात; विधानसभेत आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापलं
 शहर

'आनंदी-रमा ' नाट्य-अभिवाचन २७ जून रोजी

डिजीटल पुणे    23-06-2026 17:44:35

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत  'स्टुडिओ ६४' निर्मित "आनंदी-रमा" या  नाट्य-अभिवाचनाचा कार्यक्रम  आयोजित करण्यात आला आहे.शनिवार, २७ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवन चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता येथे हा कार्यक्रम होणार आहे.पेशवाईच्या इतिहासातील  स्वाभिमानी आणि लक्षवेधी स्त्रीचे व्यक्तिमत्त्व उलगडणारे हे नाट्य-अभिवाचन  एक वेगळा सांस्कृतिक अनुभव ठरणार आहे. या नाट्य-अभिवाचनाच्या लेखिका मेधा इनामदार असून दिग्दर्शन डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी केले आहे. कार्यक्रमाचे संगीत संयोजन ओंकार दीक्षित यांनी केले आहे.या सादरीकरणात  शिल्पा केतकर आणि डॉ. सीमा मोघे  हे कलाकार सहभागी होणार आहेत.  सर्वांना प्रवेश विनामूल्य असल्याची माहिती  भारतीय विद्या भवन चे संचालक प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.


 Give Feedback



 जाहिराती